फ्रेश चेहरा, हिट फॅार्मुला

मालिकेत हिट चेह-यांऐवजी नवीन चेह-यांना संधी.

फ्रेश चेहरा, हिट फॅार्मुला
Published: 28 Jul 2016 05:53 PM  Updated: 28 Jul 2016 06:00 PM

 
 
मालिकांमध्ये प्रसिद्ध चेहरे घेऊन मालिका हिट करण्याचा फंडा सध्या मोडीत काढला जातोय. हिट चेह-यांऐवजी नवीन चेह-यांना संधी दिली जातेय. नव्या चेह-यांना घेऊन येणा-या मालिका चांगल्याच हिट ठरतायेत. त्यामुळे नवीन येणा-या मालिकांमध्ये  मुख्य भूमिका करणारा अभिनेता किंवा अभिनेत्री हे फ्रेश चेहरे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 





सध्या तरूणांमध्ये  शिव हा प्रसिद्ध झालाय. काहे दिया परदेस या मालिकेत शिव म्हणजे ऋषी सक्सेना हा प्रमुख भूमिकेत असून त्याची नायिका म्हणजेच गौरीची भूमिका सायली संजीव साकारतेय.शिव आणि गौरीची जोडी सध्या रसिकांची वाहवा मिळवतेय. या आधी ऋषी सक्सेनानं काही हिंदी मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. सायली संजीवनंही काही सिनेमा आणि जाहिरातींमध्ये काम केलंय. 



 
नुकतंच सुरू झालेली मालिका 'खुलता कळी खुलेना'  या मालिकेत ओमप्रकाश शिंदे आणि मयुरी देशमुख ही दोघंही प्रमुख भूमिकेत आहेत.ओमप्रकाशनं याआधी 'का रे दुरावा' या मालिकेत सह कलाकाराची भूमिका साकारलीय.  मात्र तो ख-या अर्थाने नावारुपाला आलाय ते 'खुलता कळी खुलेना' मालिकेतूनच. नुकतची ही मालिका रसिकांच्या भेटीला आली असली तरी ओमप्रकाश-मयुरी दोघंही रसिकांना भावतायेत.





जय मल्हारया मालिकेतील देवदंत नागेने मराठी मनावर गारुड घातलंय. याआधी वीर शिवाजीमध्ये त्यानं तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली त्यानंतर, लागी तुझसे लगन, देवयानी मालिकेत भैय्या विखेपाटीलही भूमिका केली.मात्र लहानापासून ते प्रौढांपर्यंत सा-यांवर देवदत्त नागेनं साकारलेल्या जय मल्हारमधील भूमिकेनं मोहिनी घातलीय.




ऋतुजा बागवे हिनंही स्वानंदी बनत 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री घेतली त्यालाही रसिकांची भरभरुन पसंती मिळालीय.

 

दिल दोस्ती म्हणत 'दुनियादारी' मालिकेत तर  काही फ्रेश चेहरे होते. सखी गोखले, अमेय वाघ, पूजा ठोंबरे, पुष्करराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, स्वानंदी टिकेकर आणि पंकज कामकर यांना रसिकांचं भरभरुन प्रेम मिळालं . या नवोदित कलाकारांच्या अभिनयाला आणि मालिकेला बरीच लोकप्रियता मिळाली.  अमेय वाघनं मराठी सिनेमा जरी केला असला तरी त्यालाही दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेनंच प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेमुळंच हे सगळे कलाकार ओळखले जातात.



 
जुई गडकरीनं बाजीराव मस्तानीमध्ये चंदा ही भूमिका साकारली होती. तर माझिया प्रियाला प्रित कळेना मालिकेमध्ये सोनियाची भूमिका साकारली. तिच्या या भूमिका रसिकांना भावल्या. याशिवाय तुझं विन सख्या रे मध्ये लावण्या आणि आता पुढचं पाऊल मध्ये कल्याणीची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतेय. एकूणच काय तर प्रसिद्ध चेह-यांऐवजी फ्रेश आणि नवे चेहरे रसिकांना आवडत असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय.


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :