​रायजिंग स्टारमध्ये अनुष्का शर्माचा फिल्लोरी परफॉर्मन्स

​रायजिंग स्टारमध्ये अनुष्का शर्मा लवकरच येणार असून ती फिल्लोरी या चित्रपटाचे प्रमोशन तिथे करणार आहे आणि लाइव्ह परफॉर्मन्स देत त्यातील नॉटी बिल्लो हे गाणे लाँच करणार आहे.

​रायजिंग स्टारमध्ये अनुष्का शर्माचा फिल्लोरी परफॉर्मन्स
Published: 03 Mar 2017 02:26 PM  Updated: 03 Mar 2017 02:26 PM

रायजिंग स्टार या कार्यक्रमात सगळे स्पर्धक एकापेक्षा एक चांगले परफॉर्मन्स सादर करत आहेत. या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावतात. नुकताच अभिनेता गोविंदा या कार्यक्रमात आला होता. गोविंदाचा लाइव्ह परफॉर्मन्स प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळाला होता आणि आता त्याच्यानंतर आणखी एका कलाकाराचा लाइव्ह परफॉर्मन्स प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. फिल्लोरी या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी नुकतीच अनुष्का शर्मा रायजिंग स्टार या कार्यक्रमाच्या सेटवर गेली होती. या चित्रपटात ती केवळ काम करत नाहीये तर या चित्रपटाची निर्मितीदेखील तिने केली आहे. तिने याआधी एनएच 10 या चित्रपटाची निर्मिती केली होती. फिल्लोरी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी ती सध्या खूप मेहनत घेत आहे. 
फिल्लोरी या चित्रपटात दिलजीत दोसांज प्रमुख भूमिकेत झळकत आहे. दिलजीत हा रायजिंग स्टारमध्ये परीक्षकाची भूमिका बजावतो. त्याच्यासोबत अनुष्कानेदेखील या कार्यक्रमात नुकतीच परीक्षकाची भूमिका बजावली. या कार्यक्रमात अनुष्काने फिल्लोरीचे नॉटी बिल्लो हे गाणे लाँच केले. तिने हे गाणे लाँच करताना लाइव्ह परफॉर्मन्सदेखील दिला. दलजीत आणि अनुष्काने हा परफॉर्मन्स सादर करत कार्यक्रमाला चार चाँद लावले. या दोघांचा हा परफॉर्मन्स या कार्यक्रमाचे परीक्षक शंकर महादेवन, सूत्रसंचालक आणि सगळ्याच उपस्थितांना खूप आवडला. अनुष्का रायजिंग स्टार या कार्यक्रमात आली असल्याने या कार्यक्रमातील स्पर्धकदेखील खूश झाले होते. एवढेच नव्हे तर या भागात दोन वाईल्ड कार्ड एंट्रीदेखील होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या कार्यक्रमाची नक्कीच उत्सुकता लागली असणार. 






दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या नात्यात दुरावा आला आहे असे तुम्हाला वाटतंय का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :