म्हणून मेघा चक्रवर्ती शिकली बाईक चालवायला !

‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत ती उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये राहणारी तरुणी असल्याने तिला तेथील स्थानिक भाषा आणि तिचे उच्चार येणे भाग होते.तेव्हा मेघाने ती भाषा शिकण्यासाठी चक्क एका हिंदी भाषेची शिकवणी सुरू केली होती.त्यानंतर ती उत्तम हिंदीतून संवाद साधते.

म्हणून मेघा चक्रवर्ती शिकली बाईक चालवायला !
Published: 21 May 2018 03:25 PM  Updated: 21 May 2018 03:25 PM

कलाकारांना ब-याचदा भूमिकेसाठी काही गोष्टी गोष्टी शिकाव्या लागतात.कधी कोणत्या मालिकेसाठी कोणता सीन करावा लागणार हे तर काही सांगता येत नाही.मालिकेच्या कथेनुसार कलाकार आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकताना दिसतात.कधी ते घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतात तर कधी तलवारबाजी करण्याचे. अगदी त्याचप्रमाणे कृष्णा चली लंडन मालिकेच्या एका भागात मेघाला बाईक चालवायचा सिक्वेस होता.मात्र तिला बाईक चालवायला येत नाही.कथेच्या मागणीनुसार  आणि आपली भूमिका अधिकाधिक वास्तवदर्शी ठरावी यासाठी तिने बाईकही चालवायचे प्रशिक्षण घेतले.या मालिकेत कृष्णा ही व्यक्तिरेखा मेघा चक्रवर्ती साकारत आहे.  मोटरबाईक चालविणे हे मेघासाठी तसे थोडे कठिणच होते.तेव्हा मेघाने आधी काही दिवस बाईक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आणि त्याचा चांगला सराव केला. या अनुभवाविषयी मेघा म्हणाली, “मला दुचाकी वाहनांची खूप भीती वाटते.मी जेव्हा अनेक मुलींना स्कुटी चालवताना पाहते.तेव्हा मलाही त्यांच्या प्रमाणे स्कुटी चालवावी अशी इच्छा होते.त्याच स्कुटी नाही थेट बाईकच चालवायची म्हटल्यावर चालविण्यास शिकताना मी त्यावरून पडेन आणि मला दुखापत होईल, अशी मला भीती वाटत होती. पण मला विश्वास होता अशक्या अशी कोणतीच गोष्ट नाही त्यानुसार  मी आठ दिवसात बाईक चालवायला शिकले. मुळात एरव्ही कधीही स्कुटीसुद्धा न चालवणारी मी आज थेट बाईक चालवते.यावर माझा स्वतःच विश्वासच बसत नाही.हा अनुभव मला रिल लाईफसाठीच नाहीतर रिअल लाईफसामध्येही खूप फायदेशीर ठरणार आहे.

मेघाने या मालिकेच्या माध्यमातून अनेक नवीन नवीन गोष्टी शिकल्या आहेत.मुळात मेघा ही कोलकात्यातच लहानाची मोठी झाल्याने तिला बंगालीपेक्षा अन्य कोणत्याही भाषेत बोलणे अवघड जात असे.आता ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत ती उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये राहणारी तरुणी असल्याने तिला तेथील स्थानिक भाषा आणि तिचे उच्चार येणे भाग होते.तेव्हा मेघाने ती भाषा शिकण्यासाठी चक्क एका हिंदी भाषेची शिकवणी सुरू केली होती.त्यानंतर ती उत्तम हिंदीतून संवाद साधते.या मालिकेने तिला तिच्या करिअरमध्ये पुढचा टप्पा गाठण्यासाठी खूप चांगले अनुभव दिल्यामुळे ती निर्मांत्यांचेही खूप आभारी असल्याचे तिने म्हटले आहे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :