अशी साजरी करणार कलाकार आपली होळी

होळी या सणाची वाट लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच असते. या सणाची वाट सगळे आतुरतेने पाहत असतात. मग यात सेलिब्रेटी तरी कशी मागे राहितील. रंगांची उधळण करण्याची उत्सुकता त्यांनाही असते.

अशी साजरी करणार कलाकार आपली होळी
Published: 01 Mar 2018 10:14 AM  Updated: 01 Mar 2018 10:14 AM

या सणाची वाट लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच असते. या सणाची वाट सगळे आतुरतेने पाहत असतात. मग यात सेलिब्रेटी तरी कशी मागे राहितील. रंगांची उधळण करण्याची उत्सुकता त्यांनाही असते. झी टीव्हीवरील मालिकेच्या कलाकारांनी होळी सणांच्या आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि आपल्या आठवणींनादेखील या निमित्ताने उजाळा दिला आहे. करण जोटवाणी - ‘आपके आ जाने से’ मालिकेत साहिलची भूमिका रंगविणारा करण जोटवाणी म्हणतो, “यंदा मी होळी खेळणार नसून मी संध्याकाळ माझ्या पालकांबरोबर व्यतीत करून आराम करणार आहे. मला आठवतंय, होळी पेटविण्यापूर्वी आमच्या घरी सर्व नातेवाईक एकत्र जमायचे आणि यंदा मी तशा नातेवाईकांच्या संमेलनाची अपेक्षा करीत आहे. माझ्या सर्व चाहत्यांना ही होळी शांततेची आणि सुरक्षित जावो, ही शुभेच्छा!” 
अक्षय म्हात्रे  - ‘पिया अलबेला’ मालिकेत नरेनची भूमिका रंगविणारा अक्षय म्हात्रे म्हणतो, “माझ्या लहानपणी होळी म्हणजे दोन बाजूबाजूच्या निवासी संकुलातील मुलांमधील युध्दप्रसंग असे आणि आम्ही आठवडाभर आधीपासून त्यासाठी तयारी करीत असू. आम्ही पाण्याने भरलेले फुगे आणि भरपूर रंगांचा साठा आमच्याजवळ करून ठेवीत असू, म्हणजे या युध्दात आम्हाला युध्दसामग्रीची कमतरता भासू नये. यंदा मी माझ्या ‘पिया अलबेला’ मालिकेतील सर्व कर्मचारी आणि सहकलाकारांबरोबर होळी साजरी करणार आहे. सर्वांना ही होळी आनंदाची आणि सुरक्षित जावो!”शीन दास - ‘पिया अलबेला’ मालिकेत पूजाची भूमिका रंगविणारी शीन दास म्हणाली, “मी होळी नेहमीच माझ्या निवासी संकुलातील रहिवाशांबरोबर साजरी करते. आदल्या रात्री आम्ही होळी पेटवितो आणि या उत्सवाचा आनंद घेतो. तसंच होळीच्या आधी आम्ही आमच्या सोसायटीत सुंदर रांगोळी काढतो. होळीच्या दुसर्‍्या दिवशी आम्ही नैसर्गिक रंगांनी होळी खेळतो. माझ्या सर्व चाहत्यांना माझ्याकडून होळीच्या शुभेच्छा. हा रंगांचा उत्सव तुमच्या जीवनात रंग आणि आनंद भरील, अशी आशा करते.”


साहिल उप्पल - ‘जीत गयी तो पिया मोरे’ मालिकेत विराटची भूमिका साकारणारा साहिल उप्पल म्हणतो, “होळीबद्दल  माझ्या काही विचित्र आठवणी आहेत. मी आणि माझे मित्र आमच्या निवासी संकुलातील काही मुलांविरुध्द कसे पाण्याच्या फुग्यांनी ‘लढाई’ करीत असू, ते मला अजूनही आठवतं. माझ्या आजीच्या घरची मला फार आठवण येते आहे कारण ती माझ्या आईच्या मदतीने अतिशय चवदार गुज्जिया बनवीत असे. मी टीव्ही मालिकांमध्ये भूमिका रंगविण्यास प्रारंभ केल्यापासून दर मालिकेत एक तरी होळीचा प्रसंग असतोच. त्यामुळे मला सेटवरच होळी खेळायची संधी मिळते. यंदाही मी ‘जीत गयी तो पिया मोरे’ मालिकेच्या सेटवर होळी खेळणार आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी मी घरीच राहून विश्रांती घेणार आहे.”


मानसी साळवी -  ‘वो… अपना सा’ मालिकेत निशाची भूमिका साकारणारी मानसी साळवी म्हणते, “लहानपणी माझ्या बहिणीबरोबर आम्ही जी होळी खेळत असू, ती आठवण माझ्या कायमची लक्षात राहिली आहे. होळीसाठी करायची तयारी, वैशिष्ट्यपूर्ण पिचकारी आणणं आणि पाण्याच्या फुग्यांनी रंग खेळणं, हे सारं लक्षात आहे. रंग खेळण्यापूर्वी आमची आई आमच्या चेहर्‍्याला आणि केसांना नेहमी तेल लावीत असे आणि माझे वडील पोहण्याचे चष्मे आमच्या डोळ्यांवर चढवीत असत. त्यामुळे मी आणि माझी बहीण हे आम्हा सर्व मुलांमध्ये साय-फाय चित्रपटातील परक्या ग्रहावरचे प्राणी दिसत असू. पण मी जसजशी मोठी होत गेले, तसतशी होळी हा सण काहीसा गंभीर होत गेला. आमचे सारे नातेवाईक घरी जमत, आम्ही होळी पेटवीत असू, तिची पूजा करीत असू आणि त्यात नारळ टाकीत असू. होळीची आणखी एक आठवण म्हणजे मी आमच्या मालिकेच्या सेटवर खेळलेली होळी. तेव्हा सेटवर खूप धमाल येत असे. तसंच चित्रीकरण संपल्यावर आम्ही कोणत्या तरी एखाद्या कलाकाराला पकडून त्याला रंगीत पाण्याने भरलेल्या हौदात बुचकाळून काढीत असू. पण आता होळी साजरी करण्यात बदल होत चालला आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता होळी ही कोरड्या आणि नैसर्गिक रंगांनी खेळली जात असल्याने ती अधिक सुरक्षित झाली आहे.”
 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :