‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय

या मालिकेच्या माध्यमातून समीर-नैना यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेविषयी आणि आत्तापर्यंतच्या त्याच्या वाटचालीविषयी त्याच्याशी साधलेला हा संवाद...

‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय
Published: 07 Apr 2018 05:23 PM  Updated: 07 Apr 2018 05:23 PM

अबोली कुलकर्णी 

टीव्ही इंडस्ट्रीतील हॅण्डसम अभिनेता रणदीप राय सध्या सोनी टीव्हीवरील ‘यह उन दिनों की बात हैं’ या मालिकेत समीरच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. या मालिकेच्या माध्यमातून समीर-नैना यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेविषयी आणि आत्तापर्यंतच्या त्याच्या वाटचालीविषयी त्याच्याशी साधलेला हा संवाद...

*  ‘यह उन दिनों की बात है’ मालिकेविषयी आणि समीरच्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशील?
- ‘यह उन दिनों की बात हैं’ या मालिकेत नव्वदीच्या दशकातील दोन मुलांची-समीर आणि नैना यांची प्रेमकहानी आहे. एका चौकात ते दोघे एकमेकांना ज्या पद्धतीने धडकतात याची सुंदर मांडणी केली आहे. त्या दशकातील विविध गोष्टी आणि ट्रेंड पुन्हा तयार केल्याचे सुनिश्चित केले आहे. ही एक नवीन संकल्पना आहे आणि प्रेमकथेच्या वेगळ्या गोष्टी आहेत. हा प्रोजेक्ट निवडण्याचा माझा मुख्य उद्देश होता कारण की, मी याच काळाशी संबंधित आहे. माझा जन्म १९९३ मध्ये झाला आणि सलमान खानचा ‘मैंने प्यार किया’ सारखे सिनेमे पाहिले आहेत आणि मी काही वेळा त्याच्या केसांची आणि ड्रेसिंगची नक्कलही केली आहे. हा खूप चांगला अनुभव होता.

* ही मालिका प्रेक्षकांना नव्वदीच्या दशकांत घेऊन जाते. छोटया पडद्यावर हे दशक पुन्हा रंगवण्याचा विचार कसा आला? 
- समीर आणि नैना यांची लव्हस्टोरी ही अगदी युनिक आहे. पण, हे प्रेमाचे दिवस आपण सगळयांनीच जगलेले असतात. प्रत्येकाला ही मालिका पाहताना असंच वाटणार आहे की, अरे हे तर आपण आहोत. ही मालिका पाहिल्यावर अशी भावना निर्माण होणं यातच सगळे परिश्रम दडलेले आहेत. शिवाय समीर-नैनाची लव्हस्टोरी प्रत्येकाला आपलीशी करते. त्यांचे वागणे-बोलणे, राहणीमान, विचार करण्याची पद्धत, जुन्या काळातील ट्रिक्स या सर्व गोष्टी कथात्मक रूपाने बघायला खूपच छान वाटतात. 

* पडद्यावर समीरची भूमिका साकारण्यापूर्वी तूला स्वत:च्या फिटनेससाठी कोणते प्रयत्न करावे लागले?
- या मालिकेसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. जर हीच मेहनत मी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना (गमतीने बोलतो) अभ्यासात घेतली असती तर आज मी डॉक्टर किंवा इंजिनियर असतो. तरुण दिसण्यासाठी आणि आॅनस्क्रीन समीरच्या भूमिकेत फिट बसण्यासाठी मी माझे वजन कमी केले आहे. मी जवळजवळ १० किलो वजन कमी केले आहे. मी त्या काळातील प्रसिद्ध चित्रपटांच्या अभिनेत्यांसारखे लांब केस सुद्धा केले आहे. समीर महेश्वरीची भूमिका साकारण्यासाठी मी माझ्या शैलींमध्ये थोडा बदल केला आहे.

 समीर आणि रणदीपमध्ये कोणते साम्य आहे? 
- समीरबद्दल माझी आवडती गोष्ट म्हणजे त्याची चालण्याची पद्धत, तो खूप फॅशनेबल ड्रेस घालतो. आणि हे माझ्यासोबत वास्तविक जीवनाशी संबंध ठेवते कारण मी मित्र, पार्ट्या किंवा कोणत्याही असाइनमेंट्साठी घराबाहेर पडताना फार विशिष्ट  असतो. समीरचे व्यक्तिमत्त्व मला आवडणाऱ्या इतर काही गोष्टी म्हणजे श्रीमंत कुटुंबातील असल्याने तो सामाजिक नाही, तो नेहमी इतरांना नम्र असतो आणि खूप मदत करतो. मी देखील खूप नम्र आणि इतरांना मदत करणारा आहे.

* आशी सिंग आणि तुझी टीम यांच्यासोबतच्या ट्युनिंगबद्दल काय सांगशील? 
- आशी सिंग आणि माझी मालिकेची टीम यांच्यासोबत माझं खूप चांगलं ट्युनिंग आहे. मात्र, काय होतं की, आमचं सेटवर इतर गोष्टींबद्दलचं जास्त बोलणंच होत नाही. आणि मग शूटिंगनंतर प्रत्येकाची आपली पर्सनल लाईफ असते त्यामध्ये सगळे बिझी होऊन जातात. आम्ही महिन्यातून एकदा संपूर्ण टीमसोबत भेटतो. त्यावेळी मग धम्माल-मस्ती आम्ही करत असतो. 

* छोट्या पडद्यावर अनेक प्रकारच्या लव्हस्टोरीज दाखवण्यात येत आहेत. तुमची लव्हस्टोरी किती वेगळी?
- समीर-नैनाच्या लव्हस्टोरीत खरेपणा आहे. जो आम्हाला इतरांपेक्षा वेगळा सिद्ध करतो. आता ही लव्हस्टोरी हळूहळू सर्वांसमोर येत असून ती किती वेगळी आहे हे आता प्रेक्षकांनाच कळते आहे. 

* बॉलिवूडमधून जर तुला आॅफर मिळाली तर तुला कुणासोबत काम करायला आवडेल? 
- बॉलिवूडमधून जर मला आॅफर आली तर कुणासोबत करण्यापेक्षा मी मला कोणता रोल देण्यात आला आहे, याचा जास्त विचार करीन. माझ्यातील कलाकाराला त्यात किती काम करायला मिळणार आहे याचा मागोवा घेईन. त्यानंतरच मी ती आॅफर स्विकारेन.

* खऱ्या  आयुष्यातील तुझे प्रेरणास्थान कोण आहे? 
- माझे वडील आणि माझा भाऊ हे माझ्या आयुष्यातील प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यामुळे मी अनेक गोष्टी शिकलो आहे. त्यांचा आदर्श मी कायम डोळयासमोर ठेवतो.

* टीव्ही इंडस्ट्रीत जे स्ट्रगलर्स आहेत त्यांना तू कोणता संदेश देशील?
- स्ट्रगल कोण करत नाही? तुम्ही, आम्ही आपण सगळेच स्ट्रगल करतो. पण, त्याला स्ट्रगल न म्हणता शिकण्याची प्रक्रिया म्हटली तर? या वयातही अमिताभ बच्चन म्हणतात की, मी अजूनही शिकतोय. तर मग आपण कष्ट हे घेतलेच पाहिजेत. मानसिक, शारिरीक पातळीवर आपण स्ट्राँग होणं गरजेचं आहे. तरच आपण आपल्या आयुष्यात ठोस निर्णय घेऊ शकतो. त्यासोबतच अपयशासमोर खचून न जाता त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :