कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायला आवडतं-हर्षद आतकरी

प्रत्येक माध्यमाची एक जबाबदारी आहे. ते माध्यम तुम्ही कसं वापरता यावरही ब-याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे सोशल मीडियाचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणं ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.

कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायला आवडतं-हर्षद आतकरी
Published: 17 May 2017 05:54 PM  Updated: 17 May 2017 06:00 PM

कोणतंही काम कम्फर्ट झोन सोडून केलं आणि मेहनत केली तर रिझल्ट चांगला मिळतो असं मत अभिनेता हर्षद आतकरी याने व्यक्त केले आहे. हर्षद आतकरी ची प्रमुख भूमिका असलेली अंजली ही मालिका मालिका लवकरच छोट्या पडद्यावर येत आहे.याचनिमित्ताने त्याच्याशी साधलेला हा संवाद


अंजली या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल?

 अंजली ही मालिका हॉस्पिटल बेस्ड ड्रामा आहे.समाजात घडलेल्या मेडिकल केसेस आणि घटनांवर या मालिकेतून भाष्य करण्यात आलं आहे. या आगामी मालिकेत डॉ. यशस्वी खानापूरकर ही भूमिका मी साकारतो आहे.परदेशात शिकून आलेला हा एक डॉक्टर असून त्याला भारतातलं नंबर एकचं हॉस्पिटल बांधायचे आहे. रुग्ण हा हॉस्पिटलमध्ये फक्त उपचारासाठीच येतो अशी त्याची विचारसरणी आहे. हा डॉक्टर थोडा खडूस असला तरी एज्युकेटेड आहे. या मालिकेची कथा समाजात घडलेल्या विविध घटनांवर आधारित असेल. त्यामुळे एकेक करुन मालिकेतील गोष्टी उलगडत जातील. त्यामुळे ही मालिका एक वेगळा अनुभव देणारी असेल. ही मालिका खूप जास्त भागांची किंवा रटाळ होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. 

सध्या मालिकांचं मोठा गाजावाजा आणि प्रमोशन केलं जातं.तर प्रमोशन किंवा मार्केटिंग किती महत्त्वाचं आहे ?

सध्याच्या युगात आपल्या कामाचं मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एखाद्या नव्या मालिकेच्या सुरुवातीपासूनच कलाकार त्या मालिकेच्या प्रमोशनमध्ये बिझी होतात. कारण सध्याचा जमाना मार्केटिंगचा आहे आणि प्रमोशनशिवाय गत्यंतरच नाही. जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहचायचे असेल तर प्रमोशन खूप महत्त्वाचे आहे असं मला वाटते. सध्या सोशल मीडियामुळे होणा-या गोष्टी पाहिल्या तर त्याचा वापर वाढला आहे. प्रत्येक माध्यमाची एक जबाबदारी आहे. ते माध्यम तुम्ही कसं वापरता यावरही ब-याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे सोशल मीडियाचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणं ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. 

सध्याचा रसिक चोखंदळ आहे असं तुला वाटतं का?

मुळात आपल्याकडे दोन प्रकारचा रसिकवर्ग आहे.एक महिला वर्ग ज्यांना सासू सूनांचाही ड्रामा आवडतो आणि दुसरा रसिक वर्ग असा आहे ज्यांना रोज नवीन नवीन गोष्टी घडतात अशा मालिका बघायला आवडतात. त्यामुळे दोन्ही प्रकारचे रसिक महत्त्वाचे आहेत.मुळात जे रसिकांना आवडते तेच दाखवले जाते हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे त्यामुळे बदल होतायेत, ते होत राहतील आणि रसिकांना जे आवडेल, जे रुचेल, जे पटेल आणि जे भावेल तेच पाहतील.

मालिकेतील यशस्वी आणि रियल लाइफमधला हर्षद यांत किती साम्य आहे?मालिकांसोबत नाटक वगैरे करणार का?

वैयक्तीकरित्या खोट्याची मला प्रचंड चीड आहे.खोट्या गोष्टी मला आवडत नाहीत.माझ्यातील काही गुण माझ्या भूमिकेशी मिळते जुळते असतात. अशाच छटा मी माझ्या भूमिकेत शोधत असतो. सध्या मालिका करत असलो तरी एखादं छानसं व्यावसायिक नाटक करण्याची इच्छा आहे.या क्षेत्रात येण्यापूर्वी ब-याच एकांकिका केल्यात. आता एक व्यावसायिक नाटक करण्याची इच्छा आहे. त्याची वाट बघतोय.

आधुनिक जमान्यात मनोरंजनाची माध्यमं विस्तारतायत तर त्याबद्दल काय वाटतं ?रसिकांना काय आवाहन करशील ?

मनोरंजनाची माध्यमही विस्तारत आहेत.सध्या वेबसिरीज हा एक प्रकार रूढ होतोय.वेब सिरीज हा मीडियामही मला भावतो. यांत कोणतीही बंधनं नसतात. ज्या आपण मालिका सिनेमा दाखवू शकत नाही त्यावर वेबसिरीजच्या माध्यमातून भाष्य करू शकतो. कोणत्याही गोष्टींचं यांत बंधनं नसतं. तरुणाईपर्यत पोहचायचे असेन तर वेब सिरीजही चांगला पर्याय आहे. आता पर्यंत रसिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे.यापुढेही करत राहा अशी रसिकांना विनंती आहे. 


 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :