'आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात'

बऱ्याच वर्षानंतर इजाज खान ये मोह मोह के धागे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटिला येतो आहे.

'आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात'
Published: 27 Mar 2017 04:25 PM  Updated: 27 Mar 2017 04:25 PM

कही तो होगा , कुसूम, क्यों की सास भी कभी बहु थी, दिया और बाती हम यासारख्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची इजाज खान वेगळी छाप सोडली होती. तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करायला तयार झाला आहे. मोह मोह के धागे या मालिकेव्दारे तो प्रेक्षकांच्या भेटिला येतोय. या मालिकेत एजाजचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामालिकेच्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा.


तुझे या मालिकेत भूमिकेविषयी काय सांगशील ?
एका सरपंचाची आणि एका शहरातील मुलीची ही प्रेमकथा. या मालिकेत मी सरपंचाची अतिशय वेगळी भूमिका साकारत आहे. या माणसाला तरुणपणातच अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या आहेत. सामाजिक बंधनांना झुगारून देणारे हे जोडपे आहे .
 
सरपंचाची भूमिका साकराण्यासाठी काय विशेष मेहनत घेतली आहेस ?
 गावातील पुरुष हे कधीच बारीक नसतात. ते नेहमीच पिळदार असतात असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे होतो. त्यामुळे मी 10 किलो वजन वाढवले.  तिकडची भाषा शिकण्यासाठी मी जवळपास 3 आठवडे गुजरातमधील एका गावामध्ये थांबलो होतो. तिकडच्या लोकांची जीवनशैली समजण्यासाठी मी तिकडे राहिलो होता. मी तिथे ट्रक्टर चालवायला ही शिकलो. या सगळ्याचा बराच फायदा मला माझी भूमिका साकारताना झाला. तसेच  मला गोड खायला खूप आवडते. जिलेबी, गुलाबजाम, चॉकलेट यांचा तर मी फॅन आहे. पूर्वी मला या गोष्टी खाताना अनेकवेळा विचार करावा लागत असे. पण या मालिकेच्या निमित्ताने आता माझ्या आवडत्या पदार्थांवर आनंदाने ताव मारतो. 

गेल्या काही दिवसांपासून तू टीव्ही स्क्रिनपासून दूर दिसलास या मागचे कारण काय ?
हो त्याचे कारण असे कि वयाच्या ४०व्या वर्षी आपण जे काम करतात त्यात उत्सुकता आणि आवड असली पाहिजे फक्त पैसे कमवण्यासाठी काम करायचे भले तुम्हाला त्यात आवड असो वा नसो असे करणे मला पटत नाही. ह्याचा अर्थ असा नाही की मी काम करत नाही किंवा करणार नाही पण सध्या मी माझ्या वडिलांबरोबर माझा वेळ घालवणे पसंद करतोय.

तुझा ड्रीम रोल कोणता ? 
मला नहेमीच काही तरी नवीन आणि चॅलेजिंग करायला आवडते.  मला अशा भूमिका करायला आवडतात ज्याच्या माध्यामातून मी प्रेक्षकांना बांधून ठेवू शकतात. समाज प्रबोधन देणारे  चित्रपट आणि मालिका मला करायला आवडतात.  
 


 

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :