मी अभिनेत्री असल्याचे काही वर्षं तरी विसरले होतेः निकी अनेजा वालिया

निकी अनेजा वालिया गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहात आहे. आता ती लव्ह गुनाह या मालिकेद्वारे कमबॅक करत असून या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

मी अभिनेत्री असल्याचे काही वर्षं तरी विसरले होतेः निकी अनेजा वालिया
Published: 13 Jul 2017 05:39 PM  Updated: 13 Jul 2017 05:39 PM

निकी अनेजा वालियाने बात बन जाये, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अस्तित्व एक प्रेम कहानी या मालिकेत तिने साकारलेली डॉ.सिमरन ही भूमिका तर प्रचंड गाजली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. ती आता लव्ह गुनाह या मालिकेत झळकणार असून तिच्या कमबॅकबद्दल तिच्याशी मारलेल्या गप्पा...

अस्तित्व ही मालिका 2006मध्ये संपली, त्यानंतर इतक्या वर्षांचा ब्रेक का घेतलास?
मी अस्तित्व या मालिकेत काम करत असताना माझे लग्न झालेले होते. माझे सासर हे लंडनचे आहे. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतर मी अनेक वर्षं लंडनमध्येच राहात होते. माझी मुले लहान असल्याने माझा सगळा वेळ मी केवळ त्यांनाच देण्याचे ठरवले होते. छोट्या पडद्यावर परतायचे असे एक-दोन वर्षांपासून माझ्या डोक्यात सुरू होते. पण मला ऑफर करण्यात येणाऱ्या मालिकेच्या कथा मला आवडत नसल्याने मी काम करत नव्हते.

अभिनयक्षेत्रात काम करत नसताना तू तुझा वेळ कसा घालवत होतीस?
लंडनमधील माझे जीवन अतिशय हे सुंदर सुरू होते. मी तिथे एक अभिनेत्री नव्हे तर एक पत्नी, सून, आई या भूमिका साकारत होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दोन-तीन वर्षांच्याआधी मी अभिनेत्री असल्याचेही माझ्या मुलांना माहीत नव्हते. मी लंडनमध्ये असताना क्लाऊड नाईन या एका इंग्रजी मालिकेत काम केले होते. त्यावेळी माझ्या मुलांना मी अभिनेत्री असल्याचे कळले. मुले लहान असताना अनेकवेळा लोक मला डॉ.सिमरन अशी हाक मारून माझ्याशी बोलायला येत असत. त्यावेळी मी कोणीही सिमरन नसून सिमरन नावाच्या मुलीशी माझा चेहरा मिळताजुळता असल्याने लोकांना गैरसमज होतो असे मी त्यांना सांगत असे. 

लव्ह गुनाह या मालिकेद्वारेच कमबॅक करण्याचे का ठरवले?
कमबॅक करण्यासाठी मी एका चांगल्या कथेच्या शोधात होते. ज्यावेळी मला या मालिकेची कथा आणि माझ्या व्यक्तिरेखेविषयी सांगण्यात आले, त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता या मालिकेसाठी मी होकार दिला. कारण या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा काहीशी नकारात्मक असून या व्यक्तिरेखेला अनेक शेड्स आहेत. मी या मालिकेत काम करण्यास खूपच उत्सुक आहे.

तू काही महिने तरी मुंबईत राहाणार आहेस. चित्रीकरणादरम्यान कुटुंबाला कसा वेळ द्याचा असे तू ठरवले आहेस?
मालिकेत काम करण्याचा विचार केल्यानंतर मी माझे सासू-सासरे, माझे पती सोनी आणि मुलांसोबत चर्चा केली. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यांमुळेच मी पुन्हा काम करण्याचा विचार केला. मला जुळी मुले असून ती आता दहा वर्षांची आहेत. माझ्या मुलांना सासू-सासरे आणि माझा नवरा सांभाळत आहेत. मालिकेच्या चित्रीकरणातून काही दिवसांचा ब्रेक मिळाला तर मी लंडनला जाणार आहे आणि मुलांच्या सुट्टीत ते येथे येणार आहेत असे आमचे ठरले आहे. आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले असल्याने मी मोबाइलद्वारे सतत त्यांच्या संपर्कात असते. त्यांना त्यांच्या अभ्यासाविषयी विचारत असते. 

तू बात बन जाये या मालिकेत एका कॉमिक भूमिकेत झळकली होतीस, प्रेक्षकांना तू पुन्हा विनोदी भूमिकेत कधी पाहायला मिळणार आहेस?
मला स्वतःला विनोदी भूमिका साकारायला खूप आवडतात. पण गेल्या काही वर्षांत मला विनोद भूमिकांसाठी विचारण्यातच आले नाही. एखादी चांगली विनोदी भूमिका असल्यास मला नक्कीच कॉमेडी करायला आवडेल.

सध्या वेबसिरिजचा जमाना आहे, वेबसिरिजमध्ये काम करण्याचा विचार केला आहेस का?
मी आता या मालिकेच्या निमित्ताने काही महिने तरी मुंबईत राहाणार आहे. त्यामुळे माझ्या या वेळाचा सदुपयोग करण्याचे मी ठरवले आहे. त्यामुळे वेबसिरीज करण्याचे माझ्या डोक्यात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेबसिरीजसाठी तुम्हाला तितकासा वेळ द्यावा लागत नाही. त्यामुळे मी भविष्यात तुम्हाला एखाद्या बेवसिरीजमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 

Also Read : निकी अनेजा इश्क गुनाह या मालिकेद्वारे करणार कमबॅक


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :