'हर मर्द को दर्द होता है'च्या माध्यमातून परमीत सेठ्ठी अशा प्रकारे जाणून घेणार महिल्यांच्या मनातले गुपितं

हर मर्द का दर्द दिग्दर्शकांशी साधलेला हा संवाद

'हर मर्द को दर्द होता है'च्या माध्यमातून परमीत सेठ्ठी अशा प्रकारे जाणून घेणार महिल्यांच्या मनातले गुपितं
Published: 04 Feb 2017 05:19 PM  Updated: 04 Feb 2017 08:56 PM

'दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे', 'दिल जले' अशा सिनेमात त्याने आपल्या वाट्याला आलेल्या छोट्याशा भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप पाडली. बदमाश कंपनी या सिनेमाचे दिग्दर्शन त्याने केले. हा हरहुन्नरी कलाकार म्हणजे परमित सेठी. रुपेरी पडद्यावर अभिनयाने रसिकांवर जादू करणा-या परमितने छोट्या पडद्यावरील रसिकांचीही मने जिंकली आहे. अभिनेता-दिग्दर्शक अशी ओळख निर्माण केलेला परमित सेठी ब-याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. यावेळी एक अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून परमित छोट्या पडद्यावर परतणार आहे. ‘सुमित संभाल लेगा’ या मालिकेनंतर परमित दिग्दर्शित करत असलेली हर मर्द का दर्द ही मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. याच निमित्ताने परमितशी केलेली ही खास बातचित
 
‘हर मर्द का दर्द’ शीर्षकावरुनच ही मालिका वेगळी असल्याचे भासत आहे. मराठी सिनेमा अगं बाई अरेच्चा प्रमाणे स्त्रियांच्या मनाचा आवाज पुरुषांना ऐकायला येणार आहे का ?
 
अगं बाई अरेच्चा या सिनेमाचा विषय काय होता ते मला माहित नाही. मात्र ही मालिका पूर्णपणे वेगळी. महिलांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. महिलांच्या व्यथा, त्यांचं दुःख पुरुष ब-याचदा समजून घेण्यात अपयशी ठरतो. स्त्रीचे दुःख माहित असणे ते जाणून घेणे यांत बराच फराक आहे. पुरुष स्त्रियांना चांगल्या पद्धतीने ओळखतात हे जरी खरे असले तरी ते त्यांना पूर्णपणे समजतातच असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. स्त्रियांच्या मनातील प्रत्येक गोष्टीचा विविध अंगाने केलेला विचार हा या मालिकेत रसिकांना पाहायला मिळणार आहे. स्त्रीला कोणत्याही नकारार्थी पद्धतीने दाखवण्यात आलेले नाही. या मालिकेतील स्त्रीची कथा ही आपल्या आजूबाजूला असणा-या स्त्रीयांची म्हणजेच ती एखाद्या मुलीची, आईची किंवा मग पत्नीची असेल. काही दिवसांनी समाजातील कर्तृत्ववान महिलांची म्हणजेच घराबाहेर काम करणा-या महिलांच्या मनातील गोष्टीचा आवाज रसिकांना या मालिकेतून ऐकायला मिळू शकतो. एकूणच काय तर महिलाच महिलांना समजू शकत असं बोललं जातं. मात्र या मालिकेच्या माध्यमातून पुरुषसुद्धा स्त्रीला तितक्याच चांगल्या रितीने समजू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
 
महिलांचा विषय निघालाच आहे तर तुमच्या सौभाग्यवती आणि प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री अर्चनापूरन सिंग यांच्याशी असलेल्या खास बॉडिंग आणि नात्याविषयी जाणून घ्यायला आवडेल ?
 
मी बालपणापासूनच माझ्या आईकडे आणि बहिणीकडे बघून शिकलो आहे. त्यांची छोट्यातील छोटी गोष्ट मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहे. त्यांनी शिकवण दिलेले मोठी गोष्ट म्हणजे एकमेकांना समजून घेणे. त्यामुळेच माझे आणि अर्चनाचे नाते समजूतदारपणाचे आहे असे मी ठामपणे सांगू शकतो. कारण आम्ही कधीच एकमेकांवर किंवा मी स्वतः कोणत्याही गोष्टीसाठी अर्चनावर दबाव टाकलेला नाही. अर्चनाचे स्वतःचे एक आयुष्य आहे, तिचे स्वतःचे करियर आहे. तिने त्यात यश मिळवावे यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे तिच्या कामात फार ढवळाढवळ न करता तिला गरज असलेली स्पेस मी आजवर तिला कायम दिलेली आहे. त्यामुळेच आमचे नाते आजही घट्ट टिकून आहे.
 
आपण आजवर विविध सिनेमात काम केले आहे. तर त्या करियरकडे कसे पाहता. वैयक्तिकरित्या तुम्हाला अभिनय आवडते की दिग्दर्शन ?
 
अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टींची विविध आव्हाने आहेत. त्यामुळे दोन्ही आव्हाने पेलायला आवडतात. एक अभिनेता म्हणून मला भूमिकांमध्ये विविध प्रयोग करायला आवडतात. दुसरीकडे दिग्दर्शन करताना कॉमेडी कंटेट जास्त भावतो.
 
सिनेमा-टीव्ही अशा दोन्ही माध्यमातून आपण काम केलेय. या दोन्ही माध्यमांकडे आपण कसे पाहता ?
 
दोन्ही माध्यमे वेगवेगळी असली तरी दोन्ही माध्यमांचा एक समान दुवा आहे तो म्हणजे मनोरंजन. ही दोन्ही माध्यमे रसिकांचं मनमुराद मनोरंजन करतात. त्यामुळे या दोन्ही माध्यमांची तुलना करणे खरंच कठीण आहे. एक आहे की सिनेमावर काम करताना त्यावर आपण बरीच मेहनत घेतो. मात्र त्याचा अंतिम रिझल्ट काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहावी लागते. मात्र टीव्ही माध्यमामध्ये तसे नाही. मालिकांचा रिझल्ट लगेच कळतो. कारण मालिका छोट्या पडद्यावर प्रसारीत होत असतात. रसिकांची पसंती तात्काळ करते. सध्या तर अनेक टीआरपी रेटिंग एजन्सी आहेत. त्यामुळे चॅनेल्सच्या माध्यमातून तुमच्या टीव्हीवरील कामाला रसिकांचा कसा प्रतिसाद आहे हे टीआरपी किंवा रसिकांच्या प्रतिसादामधून लगेचच समजू शकते.
 
आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहात हे जाणून घ्यायला आवडेल ?
 
आगामी काळात मी एक सिनेमा करत आहे. हा सिनेमा स्पोर्ट्सवर आधारित असेल. या सिनेमाचे दिग्दर्शन मी करणार आहे. बाकी सिनेमाविषयी आताच मी फार काही सांगू शकणार नाही. याशिवाय छोट्या पडद्यावर एका कॉमेडी मालिकेचे दिग्दर्शन करणार आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :