​यश टोंक साकारणार मदिराक्षी मुंडलेच्या भावाची भूमिका

​यश टोंक रोमिओ-ज्युलिएटच्या प्रेमकथेवर आधारित मालिकेत काम करणार असून या मालिकेत त्याच्यासोबतच मदिराक्षी मुंडले आणि विशाल वशिष्ठ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत यश नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

​यश टोंक साकारणार मदिराक्षी मुंडलेच्या भावाची भूमिका
Published: 16 Feb 2017 04:34 PM  Updated: 16 Feb 2017 04:34 PM

कही किसी रोज, कर्म अपना अपना,कसौटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेला यश टोंक आता रश्मी शर्माची निर्मिती असलेल्या एका कार्यक्रमात झळकणार आहे. यशने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. जय हो, इश्क विश्क, कुछ तो है या चित्रपटातील त्याच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 
यश सध्या त्याच्या व्यवासियक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यात खूपच खूश आहे. यशने कही किसी रोज या मालिकेतील त्याची सहकलाकार गौरीसोबत लग्न केले असून त्या दोघांना एक 13 वर्षांची मुलगी आहे. आता 13 वर्षांनंतर त्यांच्या घरात आणखी एका पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याच्या पत्नीने नुकताच त्यांच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. गेले काही दिवस तो आपल्या मुलीसोबतच जास्तीत जास्त वेळ घालवत आहे आणि आता तो पुन्हा अभिनयाकडे वळणार आहे. तो एक प्रेमकथेवर आधारित मालिकेत काम करणार आहे. रोमिओ-ज्युलिएटच्या प्रेमकथेवर आधारित या मालिकेची कथा असून या मालिकेत विशाल वशिष्ठ आणि मदिराक्षी मुंडले प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेत यश मदिराक्षीच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. मदिराक्षीने सिया के राम या मालिकेत सीतेची भूमिका साकारली होती. या मालिकेतील यशची भूमिका खूपच वेगळी असणार असल्याचे म्हटले जात आहे. तो या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत यश काम करणार असल्याचे त्याने कबूल केले असले तरी त्याने या मालिकेतील त्याच्या भूमिकेबाबत सांगण्यास नकार दिला. या मालिकेते नाव साजन असणार असल्याचे म्हटले जात आहे. 
यश काही महिन्यांपूर्वी पवित्र बंधन आणि ये वादा रहा यांसारख्या मालिकेत झळकला होता. 

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :