​काम्या पंजाबीने सोशल नेटवर्किंगवर का शेअर केला तिचा टॉपलेस फोटो?

​काम्या पंजाबीने तिचा एक टॉपलेस फोटो नुकताच सोशल नेटवर्किंगवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करण्यामागे एक खास कारण आहे.

​काम्या पंजाबीने सोशल नेटवर्किंगवर का शेअर केला तिचा टॉपलेस फोटो?
Published: 10 Jul 2017 12:30 PM  Updated: 10 Jul 2017 12:30 PM

काम्या पंजाबीने कहता है दिल, पिया का घर, नागिन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण खऱ्या अर्थाने तिला प्रसिद्धी बिग बॉस या कार्यक्रमाने मिळवून दिली. बिग बॉस या कार्यक्रमाच्या सातव्या सिझनमध्ये ती झळकली होती. या सिझनच्या काहीच दिवस अगोदर तिने तिचे पती बंटी नेगीसोबत घटस्फोट घेतला होता. काम्या ही अतिशय मॉडर्न अभिनेत्री असून ती तिच्या बोल्ड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिनी नुकतीच एक बोल्ड स्टेप उचलली असून याची चांगलीच चर्चा आहे.
लिपस्टिक अंडर माय बुरखा हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेला आहे. या चित्रपटातील ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अनेक किसिंग आणि इंटिमेट सीन पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत देखील अडकला होता. पण या चित्रपटाला बॉलिवूडमधील आणि छोट्या पडद्यावरील कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे. या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक, पलबिता बोरठाकूर, आहाना कुमरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबीने देखील लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटाला पाठिंबा नोंदवला आहे. तिने या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी तिचा एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोची सध्या चांगलीच चर्चा आहे. या फोटोसोबत तिने खूप चांगली पोस्ट देखील लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते म्हणत आहेत की, त्या मुली तुम्ही बनू नका... त्या बायका... घटस्फोटीत बायका... मुलांना एकट्या सांभाळणाऱ्या बायका... पण मी तशी एक स्त्री आहे... मी दरवेळी ज्या ज्या वेळी लिपस्टिक लावते, त्यावेळी एक हास्य माझ्या चेहऱ्यावर येते. कारण मी माझ्या स्वतःशी खरी आहे. माझ्या मतांशी जग सहमत असो अथवा नसो माझे एक वेगळे जग मी बनवले आहे... 

kamya punjabi


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :