​साराभाई व्हर्सेस साराभाईचे नवे नाव काय असणार?

​साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत पहिल्या सिझनप्रमाणेच सतिश शहा, रत्ना पाठक शहा, सुमीत राघवन, मौली गांगुली, राजेश कुमार, देवेन भोजानी हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे.

​साराभाई व्हर्सेस साराभाईचे नवे नाव काय असणार?
Published: 19 Apr 2017 04:21 PM  Updated: 19 Apr 2017 04:21 PM

साराभाई व्हर्सेस साराभाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयावर अनेक वर्षं राज्य केले होते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या होत्या. त्यामुळे या मालिकेचा दुसरा सिझन केव्हा येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. या मालिकेचे निर्माते जे.डी.मजेठिया यांना नेहमीच या मालिकेच्या दुसऱ्या सिझनबाबत विचारण्यात येत असे. पण सगळ्या कलाकारांना पुन्हा एकत्र आणणे अशक्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते. पण काही महिन्यांपूर्वी या मालिकेच्या कलाकारांनी रियुनियन केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंमुळे आता हे सगळे एकत्र येणार याची खात्री प्रेक्षकांना पटली होती.
या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून ही मालिका टिव्हीवर नव्हे तर वेबसिरिजच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या पहिल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना सतिश शहा, रत्ना पाठक शहा, सुमीत राघवन, मौली गांगुली, राजेश कुमार, देवेन भोजानी यांना पाहायला मिळाले. या सगळ्यांमध्ये एक वाद सुरू असल्याचे आपल्याला या प्रोमोत दिसत होते. साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेच्या दुसऱ्या सिझनचे नाव काय ठेवायचे यावरून त्यांच्यात सुरुवातीला केवळ चर्चा सुरू होती. पण हळूहळू करत या चर्चेचे वादात रूपांतर झाले आणि शेवटी या मालिकेत साहिलची भूमिका साकारणाऱ्या सुमीत राघवनने प्रेक्षकांशी संवाद साधला आणि मालिकेचे नाव तुम्हीच सुचवा असे प्रेक्षकांना आवाहन केले. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रेक्षकांनी या कार्यक्रमासाठी नवीन नावे सुचवावी असे त्याने सांगितले. त्यामुळे या मालिकेच्या दुसऱ्या सिझनचे नाव काय असणार हे प्रेक्षकच ठरवणार आहेत.  


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :