दिव्यांका त्रिपाठीच्या मृत्यूची बातमी व्हायरल; तिने म्हटले, ‘मित्रांनो मी जिवंत आहे’!

‘ये है मोहब्बते’ फेम दिव्यांका त्रिपाठी हिचे अकस्मात निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आली. अर्थातच हा खोडसळपणा आहे.

दिव्यांका त्रिपाठीच्या मृत्यूची बातमी व्हायरल; तिने म्हटले, ‘मित्रांनो मी जिवंत आहे’!
Published: 02 Sep 2017 07:03 PM  Updated: 02 Sep 2017 07:03 PM

सोशल मीडियाचा जेवढा चांगला वापर करता येतो, तेवढाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करता येतो. त्यामुळे हे माध्यम कधी कोणासाठी अडचणीचे ठरेल हे सांगता येत नाही. आता हेच बघा ना, ‘ये है मोहब्बते’ फेम दिव्यांका त्रिपाठी हिचे अकस्मात निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आली. अर्थातच हा खोडसळपणा होता. परंतु ज्या पद्धतीने ही बातमी व्हायरल केली गेली, त्यावरून तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली. ट्विटरवर तर फी२३ कल्ल Rest in Peace Divyanka Tripathi या हॅशटॅगने हजारोंच्या संख्येने ट्विट केले गेले. अखेर या संपूर्ण ‘हॉच-पॉच’ शांत करण्यासाठी स्वत: दिव्यांकाला ‘मी जिवंत आहे’ अशा आशयाचे ट्विट करावे लागले. 

दिव्यांकाने तिच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करताना लिहिले की, ‘काही लोक माझ्या निधनाची बातमी पसरवित आहेत. मित्रानो मी जिवंत आहे. अशाप्रकारच्या अफवा पसरवून माझा परिवार आणि चाहत्यांना त्रस्त करू नका.’ दिव्यांकाचे हे ट्विट आल्यानंतर तिचे चाहते आणि फॉलोअर्सकडून काहीसे सकारात्मक रिप्लाय येण्यास सुरुवात झाली. तिच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘रेस्ट इन पीस त्या व्यक्तीसाठी ज्याने ही अफवा पसरविली.’ वास्तविक सेलिब्रिटींबाबत अशाप्रकारची पहिल्यांदाच अफवा पसरविण्यात आली, असे नाही. या अगोदरही सोशल मीडियावर मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या निधनाची अफवा पसरविण्यात आली. 

त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, महानायक अमिताभ बच्चन, लता मंगेशकर अशा कित्येक सेलिब्रिटींच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या आहेत. दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया नुकतेच हनिमूनहून परतले आहेत. विवेक आणि दिव्यांका भोपाळ येथे सुट्या एन्जॉय करीत होते. दिव्यांका आणि विवेकने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हनिमूनचे बरेचसे फोटोही अपलोड केले आहेत. मोठ्या ब्रेकनंतर दिव्यांका पुन्हा एकदा कामावर परतली आहे. परंतु कामाला सुरुवात करताच तिला अशाप्रकारच्या अफवांचा सामना करावा लागला. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारची अफवा टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्याबाबतीत पसरविण्यात आली होती. 

काही दिवसांपूर्वीच दिव्यांका आणि विवेकने श्री गणरायाची एकत्र आरती केली. यावेळेचे तिचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. त्याचबरोबर तिचा एकता कपूरसोबतचा सेल्फीही सध्या व्हायरल होत आहे. ‘ये है मोहब्बते’ या मालिकेमुळे दिव्यांका लोकप्रिय झाली आहे. त्याचबरोबर ‘नच बलिये’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा किताबही दिव्यांका आणि विवेकने पटकविला आहे. अशात जर तुमच्या कानावर अशाप्रकारची अफवा पडली तर त्याकडे दुर्लक्ष करा एवढेच.  


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :