​उपेंद्र लिमयेचे शूटिंग चक्क तीन वेळा थांबवावे लागले...!

नकुशी या मालिकेत सध्या उपेंद्र लिमये रणजीतची भूमिका साकारत आहे. त्याच्या या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे एका चित्रपटाच्या टीमला चक्क तीन वेळा त्यांचे शूटिंग थांबवावे लागले...!

​उपेंद्र लिमयेचे शूटिंग चक्क तीन वेळा थांबवावे लागले...!
Published: 26 Jul 2017 02:04 PM  Updated: 26 Jul 2017 03:43 PM

स्टार प्रवाहच्या नकुशी या मालिकेतील नकुशी-रणजित ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत प्रसिद्धी आयलवार नकुशीची तर उपेंद्र लिमये रणजितची भूमिका साकारत आहे. उपेंद्र लिमयेने या मालिकेद्वारे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या मालिकेत बिनधास्त अॅटिट्यूडमध्ये वावरणारा रणजित प्रेक्षकांना खूप आवडतो. त्याची बोलण्याची ढबही एकदम खास आहे. म्हणूनच लालबागचा रणजित प्रेक्षकांना आपलासा वाटतो. रणजित ही व्यक्तिरेखा लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे, याचा अनुभव देणारी एक घटना नुकतीच पुण्यात घडली. नकुशी या मालिकेतील रणजित ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता उपेंद्र लिमयेला फॅन्सनी गराडा घातला. यामुळे तीन वेळा तरी चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले.
उपेंद्र लिमये पुण्यातील कल्याणीनगर इथे एका चित्रपटाचे शूट करत होता. नकुशी मालिकेतला आपला आवडता रणजितभाई आल्याचे कळताच फॅन्सही शूटिंगच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांना रणजित भाईला म्हणजे उपेंद्रला भेटायचे होते. मात्र, उपेंद्र चित्रीकरणात व्यग्र होता. त्यामुळे फॅन्सनी 'रणजितभाई' 'रणजितभाई' म्हणून हाका मारण्यास सुरुवात केली. अनेकदा विनंती करूनही फॅन्स थांबण्यास तयार नव्हते. या गोंधळात शूटिंग करणे शक्य नसल्याने तीन वेळा शूटिंग थांबवावे लागले. अखेर, फॅन्सच्या मागणीनुसार स्वत: उपेंद्रने त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांचे समाधान झाले आणि वातावरण शांत झाले.
एकीकडे प्रत्यक्ष भेटण्यासाठी फॅन्सची गर्दी झालेली असताना सोशल मीडियातही रणजितभाई लोकप्रिय आहे. स्टार प्रवाहच्या फेसबुक पेजवरील 'रणजितभाईला राग येतो तेव्हा' या व्हिडिओला एका लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Also Read : ​​‘नकुशी’ फेम प्रसिद्धी आयलवारने घेतली पहिली कार


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :