​कोई लौट के आया है मालिकेच्या सेटवर सुरभी ज्योतीने केली चोरी

​कोई लौट के आया है मालिकेच्या सेटवर सुरभी ज्योतीने चक्क शरद केळकरची व्हॅनिटी व्हॅनच चोरली. ब्रेक टाइममध्ये तिला खूप झोप येत होती. त्यामुळे ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेली. पण तिथे गेल्यावर तिच्या व्हॅनिटी व्हॅनचा एसी बंद असल्याचे तिच्या लक्षात आले आणि त्यामुळे तिने काही वेळ शरदच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये झोप काढली.

​कोई लौट के आया है मालिकेच्या सेटवर सुरभी ज्योतीने केली चोरी
Published: 17 Mar 2017 01:03 PM  Updated: 17 Mar 2017 01:03 PM

कोई लौट के आया है मालिकेत सुरभी ज्योती प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेत शरद केळकरदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शरद त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात प्रचंड व्यग्र आहे. तरीही या चित्रपटांच्या चित्रीकरणातून वेळ काढून त्याने नुकतीच ही मालिका स्वीकारली आहे. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान नुकतीच एक गंमत झाली.
सुरभी ज्योतीने मालिकेच्या सेटवर चक्क चोरी केली. सुरभीने काय चोरले आहे हे ऐकले तर तुम्हाला नक्कीच हसू कोसळेल. या मालिकेच्या सेटवर तिने चक्क शरद केळकरची व्हॅनिटी व्हॅन चोरली. सुरभी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असल्याने तिचे चित्रीकरण हे खूप तास सुरू असते. या चित्रीकरणातून वेळ मिळाला तर ती लगेचच व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन आराम करते. काही दिवसांपूर्वी मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना लंच टाइमध्ये तिला झोपायचे होते. त्यासाठी ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेली. पण तिथे गेल्यानंतर तिच्या व्हॅनिटी व्हॅनचा एसीच सुरू नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिला खूपच झोप येत असल्याने ती शरदच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन झोपली. त्यावेळी शरद त्याच्या चित्रीकरणात व्यग्र होता. त्यामुळे तिने तिथे मस्त झोप काढली. पण शरद तिथे गेल्यानंतर त्याला सुरभीला आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये झोपलेले पाहून फोटो काढण्यावाचून राहावले नाही. याविषयी सुरभी सांगते, "मला चित्रीकरणाच्यावेळी अनेकवेळा खूप झोप येते. मी पुन्हा ताजीतवानी होण्यासाठी कितीही तास झोपू शकते. त्या दिवशी माझी व्हॅनिटी व्हॅन खराब झाल्याने मी शरदच्या व्हॅनिटीमध्ये काही तास झोपले." 



सरोगसी पद्धतीने कुंवारा बाप होण्याचा बॉलिवूडमध्ये ट्रेंड आला आहे का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :