छोट्या पडद्यावरील रसिकांचा लाडका चला हवा येऊ द्या हा शो काही काळासाठी ब्रेकवर आहे. अल्पविरामानंतर थुकरटवाडीतील विनोदवीर पुन्हा एकदा रसिकांना खळखळून हसवण्यासाठी येणार आहेत. मात्र सा-यांचे लाडके विनोदवीर या सध्या मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत आहेत. कुणी आपल्या कुटुंबीयांसह तर कुणी आवडत्या ठिकाणी जाऊन सुट्टीचा आनंद घेत आहे. चला हवा येऊ द्या शोमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रत्येक विनोदवीर हसवत असतो. या विनोदवीरांमध्ये श्रेया बुगडेही काही मागे नाही. तीसुद्धा शोमध्ये कधी श्रीदेवीची मिमिक्री करते तर कधी हटके भूमिका साकारुन रसिकांचं मनोरंजन करते. सध्या रसिकांची लाडकी श्रेया काय करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की तुमची लाडकी श्रेया काय करत आहे. श्रेया सध्या जपानमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. जपान टूरचे काही फोटो श्रेयाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने विमानतळावरील फोटोही शेअर केला होता. त्यात तिने या जपानच्या टूरविषयी सांगितले होते. आता इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत श्रेया या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी निसर्गाच्या सान्निध्यात तर कधी हॉटेलवर निवांत क्षण घालवत विश्रांती घेत असल्याचे श्रेयाच्या या फोटोत पाहायला मिळत आहे. याशिवाय शॉपिंगचाही श्रेयाने आनंद घेतल्याचे पाहायला मिळत आहे. एका मॉलमधील फोटोही तुम्हाला पाहायला मिळतील. एकूणच काय तर जपानच्या ट्रीपमध्ये श्रेय फुल ऑन धम्माल करत असल्याचे दिसून येत आहे. याआधी या ब्रेकमध्ये चला हवा येऊ द्याच्या टीमने लंडन आणि पॅरिसवारीही केली आहे. त्यावेळी प्रत्येक कलाकाराने धम्माल मस्ती केली. लंडनमध्ये त्यांच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय श्रेयाने विविध कलाकारांची मिमिक्री करत परदेशातील आपल्या फॅन्सचं मनोरंजन केलं. श्रेया आणि टीमनं पॅरिसच्या प्रसिद्ध अशा आयफेल टॉवरलाही भेट दिली.याशिवाय लंडन आणि पॅरिसमधील विविध ठिकाणी जात चला हवा येऊ द्या शोच्या टीमनं परदेशवारीचा मनमुराद आनंद लुटला होता.. याच परदेशवारीचे विविध फोटोसुद्धा श्रेयानं सोशल मीडियावर शेअर केले होते. आता पुन्हा एकदा जपान वारीमुळे श्रेया मिळालेल्या ब्रेकचा चांगलाच उपयोग करुन घेते आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.