या दिवशी ससुराल सिमर का ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

ससुराल सिमर का ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून एका खूप चांगल्या वळणावर येऊन ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

या दिवशी ससुराल सिमर का ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
Published: 04 Sep 2017 03:18 PM  Updated: 04 Sep 2017 03:18 PM

ससुराल सिमर का ही मालिका गेल्या सहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची कथा, या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवटचा भाग १९ सप्टेंबरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत नुकतीच रोहन मेहराची एंट्री झाली आहे. रोहननेच मीडियाशी बोलताना ही मालिका संपणार असल्याचे सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना रोहनने सांगितले आहे की, या महिन्यात ससुराल सिमर का ही मालिका संपणार असल्याचे आम्हाला प्रोडक्शन हाऊसने सांगितले. खरे तर ही मालिका संपणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये येत होत्या. त्यामुळे आम्हाला याबाबत थोडीशी कल्पना होती. यामुळेच ही बातमी ऐकल्यावर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला नाही. मी ही मालिका साइन करण्यापूर्वीपासून या बातम्या येत होत्या. पण तरीही ही मालिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या मालिकेचा प्रवास माझ्यासाठी छोटासाच असला तरी तो खूप चांगला होता. मला या मालिकेत एक चांगली पण खूप वेगळी व्यक्तिरेखा साकारायला मिळाली. एका खूप चांगल्या वळणावर येऊन ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 
या मालिकेच्या सुरुवातीला शोएब इब्राहिम, अविका गौर, मनीष रायसिंघानी आणि दिपीका कक्कर प्रमुख भूमिकेत होते. पण या कलाकारांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शोएबने या मालिकेला रामराम ठोकला आणि त्याची जागा धीरज धूपरने घेतली तर सिमर ही प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दिपिकाने देखील या मालिकेला रामराम ठोकला. दिपिकानंतर किर्ती गायकवाडला आपल्याला सिमरच्या भूमिकेत पाहायला मिळाले. किर्तीने या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबँक केला. अविका आणि मनीष यांनी देखील कित्येक महिन्यांपूर्वीच ही मालिका सोडलेली आहे.

Also Read : रोहन मेहरा सेटवर ‘हा’ सीन करताना झाला गंभीर जखमी; वाचा सविस्तर!


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :