​अनिद्ध दवे आणि सुरभी आहुजा या रिअल लाइफमधील कपलचे होणार यारो का टशन या मालिकेत लग्न

यारो का टशन या मालिकेतील ​अनिद्ध दवे आणि सुरभी आहुजा हे खऱ्या आयुष्यात पती-पत्नी आहेत. आता या मालिकेतदेखील त्यांचे लग्न झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेतील लग्नामुळे त्यांच्या खऱ्या लग्नाच्या आठवणी ताज्या होणार असल्याचे ते सांगतात.

​अनिद्ध दवे आणि सुरभी आहुजा या रिअल लाइफमधील कपलचे होणार यारो का टशन या मालिकेत लग्न
Published: 20 Apr 2017 01:26 PM  Updated: 20 Apr 2017 01:26 PM

यारो का टशन या मालिकेत अनिरुद्ध दवे आणि सुरभी आहुजा आपल्याला नायक-नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. ते दोघे खऱ्या आयुष्यातही नवरा-बायको असून आता मालिकेतदेखील त्यांचे लग्न होणार आहे.
यारो का टशन या मालिकेत अनिरुद्ध दवे सुरुवातीपासून काम करत आहे तर सुरभीची या मालिकेत एंट्री काहीच महिन्यांपूर्वी झाली आहे. या मालिकेत नायिकेची एंट्री होणार असल्याचे सुरभीला कळले. या भूमिकेसाठी अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले जात होते. सुरभीने अनिरुद्धला काहीही न सांगता ऑडिशन दिले आणि ती सिलेक्ट झाली. सुरभी नायिकेची भूमिका साकारण्यासाठी सिलेक्ट झाली असल्याचे या मालिकेच्या टीमनेदेखील अनिरुद्धपासून लपवून ठेवले. सुरभीला चित्रीकरणाच्या ठिकाणी पाहिल्यावर अनिरुद्धला चांगलेच सरप्राइज मिळाले होते. 
अनिरुद्ध आणि सुरभी यांची ओळख बंधन या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्यावेळी हे दोघे केवळ फ्रेंड्स होते. विशेष म्हणजे या मालिकेत सुरभीने अनिरुद्धशी लग्न करायला नकार दिला असे आपल्याला पाहायला मिळाले होते. ही मालिका सुरू असताना या दोघांनीही लग्नाचा काहीही विचार केला नव्हता. पण या दोघांचे आई-वडील एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखतात. त्यांनी या दोघांचे लग्न ठरवले आणि 26 नोव्हेंबर 2015ला या दोघांनी अरेंज मॅरेज केले. 
यारो का टशन या मालिकेत आता अनिरुद्ध आणि सुरभी यांचे लग्न होणार असल्याने त्यांच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा मिळणार असल्याचे ते सांगतात. मालिकेत लवकरच त्यांचा साखरपुडा, हळद, संगीत आणि लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

RELATED ARTICLES

बाहुबली 2 पाहाण्यास उत्सुक आहात का ?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :