​पिया अलबेला लवकरच घेणार लीप

​पिया अलबेला ही मालिका लवकरच लीप घेणार असून या मालिकेच्या कथानकात अनेक बदल होणार आहेत.

​पिया अलबेला लवकरच घेणार लीप
Published: 01 Sep 2017 04:32 PM  Updated: 01 Sep 2017 04:32 PM

मालिकांमध्ये लीप घेतले जाणे यात काही नवीन नाही. आता पिया अलबेला ही मालिका लवकरच काही वर्षांचा लीप घेणार आहे. मालिकेने लीप घेतल्यानंतर मालिकेच्या कथानकात खूप बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेत नरेन आणि पूजाची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पण आता पुढील काही भागांमध्ये पूजाच्या पत्रिकेत दोष असल्याचे सगळ्यांना कळणार आहे. या दोषामुळे नरेनचे आयुष्य धोक्यात असल्याने मामाजी चांगलेच टेन्शनमध्ये येणार आहे. त्यामुळे मामाजी पूजाला नरेनपासून दूर जाण्यासाठी सांगणार आहेत. मामाजींचे ऐकून गौरी विसर्जनच्याआधी पूजा व्यास कुटुंब सोडून जाणार आहे. पूजा कोणत्या कारणाने गेली याची कल्पना नरेनला नसल्याने नरेन शॉकमध्ये जाणार आहे आणि त्यामुळे तिचा तिरस्कार करायला लागणार आहे. त्यामुळे लीपनंतर पूजा आणि नरेन एकमेकांपासून दूर गेल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे निलिमा आणि राहुल जामिनावर बाहेर येणार आहेत. त्यांच्या या परिस्थितीसाठी पूजाच जबाबजार आहे असे त्यांचे मत असल्याने ते नरेन आणि पूजाचा बदला घेण्याचे ठरवणार आहेत आणि नरेनची सगळी संपत्ती हिसकावून घेणार आहेत. या सगळ्यामुळे मालिकेच्या कथेत अनेक उलाथापालथ होणार असून ही मालिका अधिकच रंजक बनणार आहे.
पिया अलबेला या मालिकेत अक्षय म्हात्रे आणि शीन दास प्रमुख भूमिका साकारत असून त्या दोघांची ही पहिलीच मालिका आहे. त्या दोघांच्या अभिनयाचे प्रेक्षक चांगलेच कौतुक करत आहेत. 
मालिकेने लीप घेतल्यानंतर शीन आणि अक्षयसोबतच सगळ्या कलाकारांचा लूक खूप वेगळा असणार असून त्यावर मालिकेची टीम सध्या काम करत असल्याचे कळतेय. 

Also Read : पिया अलबेला या मालिकेतील शीन दास आणि पारुल चौधरी खऱ्या आयुष्यात आहेत बेस्ट फ्रेंड्स


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :