​क्या कुसूर है अमला का या मालिकेच्या सेटवर पंखुडी अवस्थीने न्यूडल्सवर काढले दिवस

​क्या कुसूर है अमला का या मालिकेत पंखुडी अवस्थी प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच हिमाचल प्रदेशमध्ये करण्यात आले. त्यावेळी पंखुडीला तिथले स्थानिक पदार्थ न आवडल्याने तिने न्यूडल्सवर आणि मोमोज खाणेच पसंत केले.

​क्या कुसूर है अमला का या मालिकेच्या सेटवर पंखुडी अवस्थीने न्यूडल्सवर काढले दिवस
Published: 27 Mar 2017 05:44 PM  Updated: 27 Mar 2017 05:44 PM

क्या कुसूर है अमला का ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची कथा फातमागुल या तुर्की मालिकेवर आधारित आहे. कठीण प्रसंगाना धीराने तोंड देणाऱ्या एका साध्या, लाघवी आणि तीव्र, इच्छाशक्ती असलेल्या मुलीची या मालिकेत कथा पाहायला मिळणार आहे. 
क्या कुसूर है अमला का या मालिकेच्या कथानकानुसार या मालिकेच्या टीमने हिमाचल प्रदेशमध्ये चित्रीकरण करणे पसंत केले. या मालिकेच्या अनेक भागांचे चित्रीकरण तिथेच करण्यात आले आहे. मालिकेचे चित्रीकरण तेथील काही निसर्गरम्य ठिकाणांत करण्यासोबत या मालिकेच्या चित्रीकरणासाठी एका छानसा सेटदेखील तिथे उभारण्यात आला होता. या मालिकेत अमला ही प्रमुख भूमिका पंखुडी अवस्थी साकारत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान केवळ न्यूडल्स आणि मोमोज खाऊन पंखुडीने दिवस घालवले. पंखुडी ही स्वच्छतेच्या बाबतीत विशेष दक्ष असते. हिमाचल प्रदेशमध्ये चित्रीकरण करत असताना मालिकेची संपूर्ण टीम तिथले स्थानिक जेवण जेवत असे. पण पंखुडीच्या मनात या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित झाल्यामुळे तिने संपूर्ण काळ केवळ मोमो आणि न्यूडल्सच खाणे पसंत केले. या मालिकेच्या सेटवर गॅस आणि काही भांडी असल्याने ती स्वतःचे जेवण स्वतःच बनवत असे. चित्रीकरणातून थोडा जरी वेळ मिळाला तर ती धरमशालामधील गरमागरम वातावरणात स्वतःच न्यूडल्स आणि मोमो बनवत असे आणि ते खात असे. पंखुडीला स्थानिक जेवण न आवडल्यामुळे तिने न्यूडल्स खाण्याचवरच भर दिला होता. काहीही भलतसलते खाऊन आजारी पडण्यापेक्षा तिने न्यूडल्स खाणेच पसंत केले. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :