‘लागीरं झालं जी’ फेम 'अज्या'चा हा डॅशिंग अवतार तुम्ही पाहिलाय का?

एखाद्या ख-याखु-या फौजीला रिअलमध्ये जी मेहनत करावी लागते तशीच मेहनत तो आपल्या फिटनेसवर घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘लागीरं झालं जी’ फेम 'अज्या'चा हा डॅशिंग अवतार  तुम्ही पाहिलाय का?
Published: 14 Sep 2017 10:42 AM  Updated: 14 Sep 2017 10:44 AM

छोट्या पडद्यावर सध्या ‘लागीरं झालं जी मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचं दिवसेंदिवस रंजक होत चाललेलं कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे अल्पावधीत मालिका लोकप्रिय ठरली आहे. फौजींच्या जीवनावरील आधारित या मालिकेत अज्या म्हणजेच अजिंक्य आणि शीतली अर्थात शीतलची लव्हस्टोरीही रसिकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत आता अज्या आणि शीतलीची प्रेमकथा फुलू लागलीय. अजिंक्य आणि शीतल रसिकांच्या घराघरात लोकप्रिय झाले आहेत. शीतल ही भूमिका अभिनेत्री शिवानी बोरकर हिनं साकारली आहे. तर अजिंक्यची भूमिका नितीश चव्हाण यानं साकारली आहे. मालिकेत अजिंक्य लष्करात दाखल होण्यासाठी मेहनत करत आहे. एखाद्या ख-याखु-या फौजीला रिअलमध्ये जी मेहनत करावी लागते तशीच मेहनत तो आपल्या फिटनेसवर घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कपाळावर चंद्रकोर, आकर्षक शरीरयष्टी यामुळे अजिंक्यचा लूक ऑनस्क्रीन लूक रसिकांमध्ये विशेषतः तरुणींमध्ये हिट ठरत आहे. आता तुमच्या लाडक्या अजिंक्यचा म्हणजेच नितीश चव्हाणचा डॅशिंग लूक समोर आला आहे. कुण्या आघाडीच्या मॉडेलला लाजवेल असा डॅशिंग, रॉकिंग आणि कूल अंदाज तरुणींना घायाळ करेल. टी-शर्ट, स्टायलिश जीन्स आणि आकर्षक अशी बॉडी असा अंदाज असलेला अजिंक्यचा हा फोटो खास आणि तितकाच आकर्षक आहे. नितीश चव्हाणचा हा जुना फोटो पाहून कुणीही त्याला ओळखू शकणार नाही. मात्र त्यानं आपल्या फिटनेस आणि शरीरयष्टीवर घेतलेली मेहनत तुम्हाला नक्कीच कळेल. 27 वर्षीय नितीशचा जन्म साता-यात झाला आहे. दापोलीत प्राथमिक शिक्षण, वाईमध्ये उच्चशिक्षण आणि पुढील शिक्षण त्याने पुण्यात पूर्ण केले. अभिनय आणि नृत्याची त्याला सुरुवातीपासूनच आवड होती. जेननेक्स्ट नावाची त्याने डान्स अकादमीही सुरु केली होती. अभिनयासोबतच नितीश डान्सिंगमुळेही लोकप्रिय आहे. आता लाडक्या अज्याचा हा डॅशिंग अंदाज पाहून तरुणींसह त्याच्या तमाम फॅन्सनाही आश्चर्याच वाटलं असणार हे मात्र नक्की.

Also Read:पाहा:'लागिरं झालं जी' फेम 'शीतली म्हणजेच शिवानी बावकर'चा ग्लॅमरस अंदाज 

'लागिरं झालं जी' या मालिकेने छोट्या पडद्यावर एंट्री करताच अल्पावधीतचरसिकांची पसंती मिळवली.पहिल्या एपिसोडपासून सुरू झालेला या मालिकेचा छोट्या पडद्यावरचा प्रवास आता बघता बघता 100 एपिसोडपर्यंत येऊन पोहचला आहे.नुकतेच या मालिकेने 100 भाग पूर्ण करत मालिकेच्या सेटवर जल्लोषात केक कटींग करत सेलिब्रेशन केले.


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :