​क्योंकी साँस भी कभी बहू थी फेम रोनित रॉय आणि स्मृती इराणीची झाली अचानक भेट

क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेतील मिहिर आणि तुलसीची जोडी प्रेक्षकांची प्रचंड लाडकी होती. या मालिकेत मिहिरची व्यक्तिरेखा साकारणारा ​रोनित रॉय आणि तुलसीची व्यक्तिरेखा साकारणारी स्मृती इराणीची नुकतीच अचानक भेट झाली. त्यांच्या भेटीचा फोटो रोनितने ट्विटरला पोस्ट केला आहे. या फोटोला अनेक लाइक्स मिळत असून अनेकजण यावर कमेंट करत आहेत.

​क्योंकी साँस भी कभी बहू थी फेम रोनित रॉय आणि स्मृती इराणीची झाली अचानक भेट
Published: 03 Apr 2017 10:05 AM  Updated: 03 Apr 2017 10:05 AM

क्योंकी साँस भी कभी बहू थी ही मालिका संपून आज अनेक वर्षं झाली असली तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतात. मिहिर आणि तुलसी या मालिकेतील दोन प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडायच्या. या मालिकेत मिहिरची व्यक्तिरेखा रोनित रॉय तर तुलसीची व्यक्तिरेखा स्मृती इराणीने साकारली होती. या मालिकेसाठी त्या दोघांना अनेक पुरस्कारदेखील मिळालेले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक गाजलेल्या मालिकांमध्ये क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. 
रोनित आजही अनेक चित्रपट, मालिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आज इतक्या वर्षांत तो छोट्या पडद्यावरचे एक महत्त्वाचे नाव बनला आहे. पण स्मृती इराणीने अभिनयक्षेत्र सोडून अनेक वर्षं झाले आहे. स्मृती काही वर्षांपूर्वी राजकारणाकडे वळली आणि आज ती केंद्रिय मंत्री आहे.
स्मृती आज अभिनयक्षेत्रापासून दूर असल्याने तिची तिच्या जुन्या सहकलाकारांशी भेट खूपच कमी होते. पण विमानातून प्रवास करताना नुकतीच तिची आणि रोनितची भेट झाली आणि त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. रोनितने स्मृतीसोबतचा विमानातील फोटो पोस्ट करून स्मृती इराणीला भेटून खूप आनंद झाला असे ट्वीट केले आहे.
स्मृती आणि रोनित ही एकेकाळची प्रसिद्ध जोडी होती. त्यांना छोट्या पडद्यावरचे फेमस कपल मानले जात असे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर आपल्या या आवडत्या जोडीला पुन्हा पाहून त्यांच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे. रोनितने ट्वीट केल्यापासून त्याच्या ट्वीटला अनेक लाइक्स मिळत असून अनेकजण त्यावर कमेंट करत आहेत. 

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :