जाणून घ्या कॉमेडीयन कपिल शर्मा आणि नवज्योतसिंह सिद्धूच्या कमाईचा आकडा

कपिल शर्मानेही अतिउत्साहाच्या भरात गेल्या वर्षी बोलता बोलता आपल्या कमाईविषयी अप्रत्यक्ष कबुली दिली होती.

जाणून घ्या कॉमेडीयन कपिल शर्मा आणि नवज्योतसिंह सिद्धूच्या कमाईचा आकडा
Published: 13 Jul 2017 01:25 PM  Updated: 13 Jul 2017 01:27 PM

कलाकारांचं आयुष्य,त्यांच्या जीवनात घडणा-या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टी आणि घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या रसिकांना असते. कलाकारांची लाइफस्टाईल ही त्यांच्या कमाईवर आधारित असते. रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी या कलाकारांना मानधन मिळत असते. प्रत्येक कलाकाराला त्याच्या लोकप्रियतेनुसार मानधन मिळत असते. आता तुमच्या लाडक्या कलाकाराला किती मानधन मिळते हे तुम्हालाही घ्यायची नक्कीच उत्सुकता असणारच सध्या सुनील ग्रोवरसह झालेल्या वादामुळे कपिल चर्चेत तर आहेच मात्र आता त्याच्या इनकममुळे ही तो चर्चेत आला आहे.लहानांपासून थोरांपर्यंत आपला हजरजबाबीपणा आणि कॉमेडीसह फुल ऑन एंटरटेन्मेंट करणा-या कपिल शर्मानेही अतिउत्साहाच्या भरात  गेल्या वर्षी बोलता बोलता आपल्या कमाईविषयी अप्रत्यक्ष कबुली दिली होती. वर्षाला 15 कोटी रुपये कर भरत असल्याचे कपिलने म्हटलं होतं. यावरुनच कपिलचे एका भागाचे मानधन हे 60 ते 80 लाख रुपये असल्याचे उघड झाले होते.पण कपिलच्या कमाईचा हा आकडा 2016 या वर्षाचा होता. त्याचा हा इनकम ग्राफ 2012 पासून कमालीचा वाढत गेल्याचे पाहायला मिळत आहे. वर्ष 2012मध्ये (3 कोटी),2013मध्ये  (7 कोटी), 2014मध्ये (12 कोटी) 2015 मध्ये (19 कोटी) तर 2016मध्ये (29 कोटी) रू इतके कपिलने कमाई केली होती.नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच कपिलने त्याचे मानधनही वाढवले होते अशी माहिती मिळतेय. हे तर झाले कपिलविषयी मात्र कपिलसह हास्याचे फवारे उडवणार नवज्योतसिंह सिद्धूही त्यांच्या कमाईमुळे चर्चेत आहेत. एका न्युज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार नवज्योतसिंह सिद्धूकडे जवळपास 45.91 कोटींची संपत्ती आहे. फक्त कपिल शर्माच्यामधून सिद्धूला वर्षाला 25 कोटी रुपये मिळतात.त्यामुळे कपिल आणि सिध्दु यांचा इनकम ग्राफ पाहाता ''देने वाला जब भी देता,देता छप्पर फाडके'' असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :