​बेहद या मालिकेसाठी जेनिफर विंगेटने केले टक्कल

बेहद या मालिकेत जेनिफर विंगेटचे नवे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील माया या व्यक्तिरेखेने टक्कल केल्याचे आपल्याला दिसणार आहे.

​बेहद या मालिकेसाठी जेनिफर विंगेटने केले टक्कल
Published: 13 Jul 2017 12:59 PM  Updated: 13 Jul 2017 01:00 PM

बेहद या मालिकेत जेनिफर विंगेट माया ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे. मायामध्ये असलेला वेडेपणा तिने तिच्या भूमिकेतून खूपच चांगल्याप्रकारे सादर केला आहे. या मालिकेद्वारे जेनिफरने छोट्या पडद्यावर कमबॅक केला आहे. या मालिकेमुळे तिच्या करियरला एक चांगले वळण मिळाले आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. जेनिफर आता या मालिकेत प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मायाने टक्कल केलेले दिसणार आहे. जेनिफरच्या या नव्या लूकचे फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. 
जेनिफरने पूर्णपणे टक्कल केलेले या फोटोत दिसत असून हे पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसत आहे. जेनिफरने या मालिकेसाठी केस कापले आहेत का हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण तिने टक्कल केले नसून ही मेकअपची करामत आहे. ती या मालिकेसाठी सध्या विग लावत आहे. जेनिफरने या फोटोसोबत एक कॅप्शन लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, बोल्ड टू बाल्ड... मी टक्कल केले आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. या माझ्या लूकसाठी माझे मेकअपमन धनंजय दादा सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांनी मायाचा बाल्ड पण ब्युटिफूल अवतार लोकांच्यासमोर आणला आहे. माझ्या या नव्या रूपाला पाहाण्यासाठी बेहद ही मालिका नक्कीच पाहात राहा...
या पोस्टसोबतच तिने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओत प्रेक्षकांना जेनिफर माया कशी बनते हे आपल्याला  पाहायला मिळत आहे. 

Also Read : बेहद फेम जेनिफर विंगेटने करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
 


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :