​करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकरसोबत माझी चांगली मैत्री असे सांगतेय क्रितिका कार्माला

​करण कुंद्रा आणि क्रितिका कार्मा हे कितनी मोहोब्बत है या मालिकेच्यावेळी एकमेकांच्या नात्यात होते. पण काही वर्षांनंतर त्या दोघांनी ब्रेकअप केले. आज करण अनुष्का दांडेकरसोबत नात्यात आहे. करण आणि अनुष्कासोबत माझी खूप चांगली मैत्री असल्याचे क्रितिका सांगते.

​करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकरसोबत माझी चांगली मैत्री असे सांगतेय क्रितिका कार्माला
Published: 25 Feb 2017 02:57 PM  Updated: 25 Feb 2017 04:25 PM

क्रितिका कार्मा आणि करण कुंद्रा अनेक वर्षं नात्यात होते. कितनी मोहब्बत है या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत असे. पण कितनी मोहोब्बत है ही मालिका संपल्यानंतर काहीच महिन्यात त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. करण सध्या व्हिजे अनुष्का दांडेकरसोबत नात्यात आहे. करण आणि अनुष्का नेहमीच त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात. आज करण आणि अनुष्काचे ब्रेकअप होऊन कित्येक महिने झाले असले तरी ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. एवढेच नव्हे तर क्रितिका आणि अनुष्का या दोघीदेखील एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

karan kundra and anusha dandekar

करण, क्रितिका आणि अनुष्का अनेकवेळा एकत्र फिरायला जातात. तसेच खूप मजा-मस्ती करतात असे क्रितिका सांगते. तसेच अनुष्का ही करणसाठी अगदी योग्य असल्याचेही तिचे म्हणणे आहे. अनुष्का आणि करण हे खूप चांगले जोडपे असल्याचेही तिला वाटते. याविषयी क्रितिका सांगते, "मी नेहमीच माझ्या पूर्वप्रियकरांसोबत चांगले नाते ठेवले आहे. करणसोबतदेखील आजही माझे नाते खूप चांगले आहे. करण आणि माझ्या नात्याची सुरुवात मैत्रीतून झाली होती आणि हे नाते पुन्हा एकदा मैत्रीवरून येऊन थांबले आहे. मी अनुष्का आणि करणसाठी खूप खूश आहे. आम्ही तिघे अनेकवेळा एकत्र फिरायला जातो. मला अनुष्का तर खूप आवडते. ती खूप चांगली मुलगी आहे. तिला मजा-मस्ती करायला आणि लोकांना हसवायला खूप आवडते. ती करणलादेखील खूप हसवते. तसेच त्याला स्टाइलमध्ये राहाण्यासाठीदेखील ती मदत करते." 


 


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :