सरोगसीने बाप बनलेल्या भाच्याला मामा गोविंदाने अशा शब्दात दिल्या शुभेच्छा!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह काही दिवसांपूर्वी सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचे आई-वडील बनले.

सरोगसीने बाप बनलेल्या भाच्याला मामा गोविंदाने अशा शब्दात दिल्या शुभेच्छा!
Published: 05 Jul 2017 09:35 PM  Updated: 05 Jul 2017 09:35 PM

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह काही दिवसांपूर्वी सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचे आई-वडील बनले. सध्या या जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण असून, दोघेही आई-वडील होण्याचे सुखद क्षण अनुभवत आहेत. त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी कृष्णाचा मामा अभिनेता गोविंदा यानेही प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदाने ‘पिंकविला’ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, ‘जेव्हा मला कळाले की, कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह आई-वडील बनलेत तेव्हा मी त्यांना फोन केला. त्यांनी मला सांगितले की, मुले अजूनही रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. मला खूप आनंद होत आहे की, हे दोघे त्यांच्या आयुष्यात पुढे जात आहेत. आई-वडील झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुुसार कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचे आई-वडील बनले आहेत. मुलांचा जन्म सहा आठवड्यांपूर्वीच झाला आहे. ही दोन्ही मुले सध्या रुग्णालयात नियोनेटल क्रिटिकल केअर युनिटमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. या दोघांनी २०१३ मध्ये अमेरिकेतील लास वेगास येथे लग्न केले होते. मात्र त्यांनी तब्बल दोन वर्ष ही बातमी कोणालाच कळू दिली नाही. त्यांनी लग्न केल्याचे सगळ्यांपासूनच लपवून ठेवले होते. २०१५ मध्ये त्यांनी लग्न केल्याचे जाहीर केले. त्यानंतर या दोघांच्या लग्नाची चर्चा समोर आली. 

कृष्णाने त्याच्या करिअरची सुरुवात ‘जस्ट मोहब्बत’ या मालिकेतून केली होती. त्यानंतर त्याने कॉमेडी करण्यास सुरुवात केली. आज त्याच्याकडे यशस्वी कॉमेडियन म्हणून बघितले जाते. लोकांना आजही त्याची कॉमेडी आवडते. त्याने एक कॉमेडियन म्हणून इंडस्ट्रीत वेगळीच छाप पाडली आहे. शिवाय तो बºयाचशा बॉलिवूडपटातही झळकला आहे. ‘बोल बच्चन’ आणि ‘एंटरटेन्मेंट’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुकही केले गेले आहे. कृष्णा लवकरच त्याची ‘ड्रामा कंपनी’ सुरू करणार आहे. 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :