पाठलाग करणाऱ्याला फरनाझने शिकवला धडा

पहिल्यांदा तिने याकडे दुर्लक्ष केले मात्र नंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिने कारचा वेग वाढविला मात्र तरीही तो बायकर तिचा पाठलाग करत होता.लगेचच तिने विचार करून एका रेस्टॉरंटजवळ आपली गाडी थांबविली आणि तो निघून जाईल याची तिने वाट पाहिली. पण, तरीही तो गेला नाही.

पाठलाग करणाऱ्याला फरनाझने शिकवला धडा
Published: 17 Apr 2018 03:48 PM  Updated: 17 Apr 2018 03:48 PM

भारतातील मोठ्या शहरात सध्या महिला सुरक्षेच्या समस्यांशी झुंज देत आहेत आणि आपल्या अभिनेत्रींनादेखील हाच अनुभव येत आहे. सिद्धीविनायकमधील फरनाझ शेट्टी ऊर्फ रिद्धीलाही नुकतेच शूटवरून परत जात असताना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले.मात्र,तिच्या पाठी लागलेल्या माणसाशी तिने घाबरून न जाता धैर्याने सामना केला आणि त्याला पळवून लावले.काही दिवसांपूर्वीच फरनाझ आपले शूट संपवून घरी जात असताना ही घटना घडली.सेटवरून ती तिच्या कारमधून घरी निघाली आणि काही वेळातच तिच्या असे लक्षात आले की, एक बाईक तिच्या कारचा सातत्याने पाठलाग करत आहे.पहिल्यांदा तिने याकडे दुर्लक्ष केले मात्र नंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिने
कारचा वेग वाढविला मात्र तरीही तो बायकर तिचा पाठलाग करत होता.लगेचच तिने विचार करून एका रेस्टॉरंटजवळ आपली गाडी थांबविली आणि तो निघून जाईल याची तिने वाट पाहिली. पण, तरीही तो गेला नाही.त्यामुळे शेवटी त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिने आपल्या गाडीचा वेग कमी केला आणि ती बाईकचा पाठलाग करायला लागली. तिचे धैर्य बघून त्या पाठलाग करणाऱ्याकडे निघून जाण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक राहिला नाही. या घटनेविषयी आपले विचार व्यक्त करताना फरनाझने सांगितले, “काम करणारी महिला म्हणून एकट्याने प्रवास करण्याची माझ्यावर खूपदा वेळ येते आणि अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्या रात्री उशीरा एकट्यानेच प्रवास करतात.आपण घाबरत नाही हे दाखविण्याची वेळ आली आहे. आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे,त्यामुळे घाबरून जाऊ नका. तसेच कायम तयार राहा - तुम्ही कुठे आहात याची माहिती कोणालातरी देऊन ठेवा आणि अशा पाठलाग करणाऱ्यांना धडा शिकविण्यापूर्वी तुमच्या आजूबाजूला लोक /वस्ती आहे याची खात्री करून घ्या.” फरनाझ तुझ्या हिमतीला सलाम! तुझ्या या वागण्याने जास्तीत जास्त महिलांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :