जजबात… संगीन से नमकीन तक या कार्यक्रमात या कारणामुळे एजाज खानला आवरले नाहीत त्याचे अश्रू...

जजबात… संगीन से नमकीन तक या कार्यक्रमात एजाज खान खूप भावूक झाला. त्याने या कार्यक्रमात आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या.

जजबात… संगीन से नमकीन तक या कार्यक्रमात या कारणामुळे एजाज खानला आवरले नाहीत त्याचे अश्रू...
Published: 25 May 2018 01:17 PM  Updated: 25 May 2018 01:17 PM

सेलिब्रिटींच्या प्रेरणादायक आणि रंजक जीवनप्रवासावर हलक्याफुलक्या पद्धतीने प्रकाझोत टाकणारा ‘जजबात… संगीन से नमकीन तक’ हा कार्यक्रम ‘झी टीव्ही’वर प्रसारित केला जात आहे. सूत्रधार राजीव खंडेलवालशी मारलेल्या गप्पांमधून किकू शारदा, गौरव गेरा, दिव्यांका त्रिपाठी, करणवीर बोहरा आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांची गुपिते आजवर लोकांना सांगितली. आता येत्या वीकेण्डला एजाज खान आणि इक्बाल खान यांच्याशी राजीव खंडेलवाल मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. २००३ मध्ये राजीव खंडेलवालबरोबरच या दोन्ही खाननी टीव्हीवरील आपल्या अभिनय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. या तिघांमधील मैत्री आजही टिकून असून आता तब्बल १५ वर्षांनी छोट्या पडद्यावर ते एकत्र येत आहेत. या गप्पांदरम्यान एजाज आणि इक्बालने आपल्या प्रारंभीच्या दिवसांतील संघर्ष आणि आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करून यशाची चाखलेली चव याविषयी सांगितले. आपण कुटुंबवत्सल असल्याने पार्ट्यांमध्ये किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याऐवजी आपण घरीच राहणे पसंत करतो, असे इक्बालने सांगितले. तर आपल्याभोवती चाहते आणि मित्रांचा गराडा पडलेला आपल्याला आवडतो, असे एजाजने सांगितले. एक्बाल आणि एजाज यांची व्यक्तिमत्त्वे एकमेकांपेक्षा अगदीच भिन्न असून त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा आहे. या गप्पांदरम्यान या दोघांनी एकमेकांची चांगलीच फिरकी घेतली आणि त्यांच्या या चेष्टामस्करीत राजीवही सहभागी झाला होता. एजाजची आजवर अनेक प्रेमप्रकरणे होऊनही तो अजूनही अविवाहित कसा, याबद्दल इक्बाल आणि राजीवने त्याची चेष्टा केली. विवाहाचे किती लाभ आहेत, याबद्दल आपण आपल्या मित्राचे इतके ब्रेनवॉशिंग करू की आता या कार्यक्रमाच्या ब्रेकमध्ये तो बाहेर जाईल आणि परत येताना एक विवाहित व्यक्ती म्हणून येईल, असे इक्बालने सांगताच सर्वत्र हास्याची कारंजी उडाली.
या सर्व हलक्याफुलक्या गप्पांमध्ये एक क्षण असा आला, जेव्हा एजाज खान खूप भावूक झाला. त्याने या कार्यक्रमात आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. त्याने सांगितले की, आईच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाला फारच अडचणी आणि त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर काही वर्षं तो वडिलांसोबत मुंबईत राहात होता, तर त्याची धाकटी बहीण त्याच्या मामांकडे राहात असे. पण त्याचा आपल्या बहिणीशी कोणत्याही प्रकारे संपर्कच नव्हता. त्याला तिला पुन्हा भेटायचे होते, तेव्हा तिचा पत्ताही त्याला ठाऊक नव्हता. तरीही त्याने चिकाटीने तिला शोधून काढले आणि ते नंतरच्या काळात एकत्र राहू लागले. एजाज खान सांगतो, “ज्या दिवशी मी माझ्या धाकट्या बहिणीला भेटलो, तो माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय दिवस आहे. मी बऱ्याच प्रयत्नांनंतर तिचा पत्ता शोधून काढला आणि नंतर थेट तिच्या घरी गेलो. तिला बघून मला अत्यानंद झाला आणि तेव्हापासून आमचं नातं दिवसेंदिवस घट्टच होत गेलं. मी काही वर्षांनी तिचं लग्न लावून दिले. तिच्या निकाहच्या कागदपत्रांवर जिथे तिच्या वडिलांची स्वाक्षरी आवश्यक होती, तिथे तिने मला स्वाक्षरी करायला लावली. तो माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण होता. माझ्यावर जर कोणी हक्क सांगू शकेल, माझ्यावर रागावू शकेल आणि मला चार गोष्टी सुनावू शकेल, तर अशी व्यक्ती ही माझी बहीणच आहे. तिच्याबरोबर आणि तिच्या मुलांबरोबर वेळ घालायला मला खूप आवडते.” त्याचे हे बोलणे ऐकल्यावर राजीवने त्या क्षणी एजाजला त्याच्या बहिणीचा खास संदेश वाचून दाखविला. तो ऐकताच एजाजच्या डोळ्यांत पाणी तरळले. एरवी आपल्याबद्दल तिला काय वाटतं, हे कधीच न सांगणाऱ्या आपल्या बहिणीने आपल्याबद्दल तिला वाटत असलेल्या प्रेमाची अशी जाहीर कबुली दिल्यावर एजाजला रडू कोसळले. यानंतर इक्बालची पत्नी स्नेहानेही मंचावर उपस्थित राहून आपल्या पतीला अनपेक्षित आनंदाचा धक्का दिला. तेव्हा एजाजने त्यांना सुखी वैवाहिक जीवनाची रहस्ये विचारली. हे दोन्ही खान ‘जजबात… संगीन से नमकीन तक’ या कार्यक्रमात एकत्र आल्यामुळे हा भाग अनेक रंजक आणि मजेदार गोष्टींनी आणि अनेक भावभावनांनी भरला.

Also Read : ​नागिन फेम अदा खानला प्रेमात मिळाला आहे विश्वासघात... ‘जजबात… संगीन से नमकीन तक’ या कार्यक्रमात केला प्रियकराविषयी खुलासा


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :