कोण आहे कपिल शर्माची गर्लफ्रेड गिनी?हिच्यासह लवकरच थाटणार लग्न

''मीट माय वाईफ,आय लव्ह हर मोअर दॅन दीपिका'' अशी पोस्टही टाकली आहे. या फोटोला बघताच अनेकांनी यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. फोटोमध्ये कपिलसोबत दिसणा-या मुलीचे नाव गिनी असून ती जालंधर येथील राहणारी आहे.

कोण आहे कपिल शर्माची गर्लफ्रेड गिनी?हिच्यासह लवकरच थाटणार लग्न
Published: 18 Mar 2017 05:12 PM  Updated: 18 Mar 2017 05:50 PM

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा हा आपल्या हास्यविनोदाने सा-यांना फुल ऑन एंटरटेन करत असतो. सगळ्यांचा फेव्हरेट कपिल शर्माविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहतेही उत्सुक असतात. नुकतेच कपिलने एक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने एका मुलीसह त्याचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला असून ''मीट माय वाईफ,आय लव्ह हर मोअर दॅन दीपिका'',''गिनी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'' अशी पोस्टही टाकली आहे.'द कपिल शर्मा' शोमध्ये अनेक अभिनेत्रींसह लग्नाचे स्वप्न रंगवणारा कपिल आधीपासूनच गिनीच्या प्रेमात पडला आहे.इतरांची हसत हसत पोल खोल करणारा कपिल मात्र त्याच्या आयुष्याविषयी उघडपणे बोलणे टाळतो.अनेकवेळा त्याच्या लव्ह लाईफविषयी चर्चा रंगतात.मात्र त्यावरही कपिल उत्तर देत नाही.अखेर आज त्याने मौन सोडले आणि आपले प्रेम जाहिर केले. तो दीपिका, आलियाच्या प्रेमात नाहीतर गिनीच्या प्रेमात असल्याचे  त्याने म्हटले आहे.या फोटोला बघताच अनेकांनी यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत.फोटोमध्ये कपिलसोबत दिसणा-या मुलीचे नाव गिनी असून ती जालंधर येथील राहणारी आहे.कपिलचे लग्न लवकर व्हावे यासाठी त्याच्या आईने फुल ऑन तयारी केली आहे.गिनी आणि कपिल या दोघांचा साखरपुडाही झाला असून आता त्यांनी लवकरात लवकर रेशीमगाठीत अडकावे अशी कपिलच्या आईची इच्छा असल्याचे कळतंय.गिनी कपिल शर्मा प्रोडक्शनचे कामही सांभाळत असल्याचे बोलले जाते.गिनी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.गिनीसह कपिलने 'हस बलिये' या शोमध्येही एकत्र कामही केले आहे.कॉलेजमध्ये असताना गिनीच्या नाटकांच्या प्रयोगांमध्येही तो तिची खूप मदत करायचा.दोघांची रोमँटीक केमिस्ट्री पाहता कपिलही लवकरच बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :