SEE PICS:तर असे तयार व्हायचे 'काहे दिया परदेस' मालिकेतील शिव आणि गौरी, बघा पडद्यामागील Photos

हे दोघेही सतत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून त्यांच्या प्रत्येक फोटोला त्यांचे चाहतेही भरभरून लाईक्स आणि कमेंटस देत असतात.

SEE PICS:तर असे तयार व्हायचे 'काहे दिया परदेस' मालिकेतील शिव आणि गौरी, बघा पडद्यामागील Photos
Published: 14 Sep 2017 04:35 PM  Updated: 14 Sep 2017 04:59 PM

'काहे दिया परदेस' मालिकेत उत्तर भारतीय शिव आणि मुंबईची मुलगी गौरी यांच्या प्रेमकथेला रसिकांची भरभरून पसंती मिळाली.दोन संस्कृतीचा, दोन परंपरांचा उत्कृष्ट मिलाफ या मालिकेच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता आला. मग ते शिवचे मुंबईत येऊन राहणे असो, दोघांचे प्रेमात पडणे असो, दोघांच्या घरुन लग्नाला संमती मिळवण्यासाठीची कसोटी असो किंवा मुंबईच्या गौरीने बनारसच्या सासरच्यांना प्रेमाने जिंकणे असो किंवा मग स्वित्झरर्लंडच्या नयनरम्य निसर्गात एकमेकांसोबत एन्जॉय केलेले रोमँटीक क्षण असो मालिकेतल्या प्रत्येक गोष्टीला रसिकांनी पसंती दिली.त्यामुळेच की काय आता ही मालिका रसिकांचा निरोप घेणार ही बातमी ऐकताच रसिक नाराजी व्यक्त करताना दिसतायेत.या मालिकेची खासियत म्हणजे फक्त मराठी रसिकांपुरतीच मर्यांदित न राहता अमराठी रसिकांचीही मालिकेने मनं जिकंली होती.मालिकेत हिंदी आणि मराठी भाषेचा करण्यात आलेल्या प्रयोगामुळे मालिकेला तुफान प्रतिसाद मिळत होता.मालिका आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे.ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षक त्यांच्या लाडक्या गौरी आणि शिवला आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीला मिस करणार यात काहीच शंकाच नाही.या मालिकेत गौरीची भूमिका अभिनेत्री सायली संजीव हिने साकारली आहे. तर ऋषी सक्सेनाने शिवची भूमिका साकारली आहे.सायली आणि ऋषी नेहमीच आपले वेगवगळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.कधी मेकअप करताना तर कधी मजा मस्ती करतानाचे ऑफस्क्रीन फोटो शेअर करत असतात. हे दोघेही सतत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून त्यांच्या प्रत्येक फोटोला त्यांचे चाहतेही भरभरून लाईक्स आणि कमेंटस देत असतात. याच आठवड्यात मालिका संपणार असल्यामुळे रसिकही त्यांचे जुने फोटो पाहून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.या आधी ऋषी सक्सेनानं काही हिंदी मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. सायली संजीवनंही काही सिनेमा आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे.मात्र ख-या अर्थाने 'काहे दिया परदेस' मालिकेने शिव(ऋषी सक्सेना) आणि गौरी ( सायली संजीवला) लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळे ही मालिका दोघांसाठी नेहमीच स्पेशल राहणार आहे.नेहमीप्रमाणे मालिकेचा शेवटचा भागही रसिकांसाठी एक सुखद अनुभव देणारा असणार आहे. गौरी जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. त्यामुळे शुक्ल परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.या गोड वळणावर या मालिकेचा येत्या 24 सप्टेंबरला शेवटचा भाग छोट्या पडद्यावर रसिकांना पाहता येणार असून या दिवशी ही मालिका रसिकांनाही अखेरचा अलविदा म्हणणार आहे.

Also Read:तुझ माझं ब्रेक-अप ही मालिका 18 सप्टेंबरपासून रसिकांच्या भेटीला 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :