‘होस्टेजेस’थ्रिलर सिरीजमध्ये झळकणार हे कलाकार

जगाने डोक्यावर घेतलेल्या अर्झोमा फॉर्मेट्सच्या एका इस्त्रायली थ्रिलरचा भारतीय रिमेक असलेल्या या सिरीजची निर्मिती बनिजय आशिया या निर्मितीसंस्थेने केली आहे.

‘होस्टेजेस’थ्रिलर सिरीजमध्ये झळकणार हे कलाकार
Published: 06 Jun 2018 04:19 PM  Updated: 06 Jun 2018 04:19 PM

‘होस्टेजेस' या त्यांच्या आगामी थ्रिलर सिरीजमध्ये अनेक वळणे, तगडे परफॉर्मन्स आणि उत्तम दिग्दर्शन पहायला मिळेल. रोनित रॉय, तिस्का चोप्रा, प्रवीण दबास आणि दिलीप ताहिल अशी बडी कलाकार मंडळी या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जगाने डोक्यावर घेतलेल्या अर्झोमा फॉर्मेट्सच्या एका इस्त्रायली थ्रिलरचा भारतीय रिमेक असलेल्या या सिरीजची निर्मिती बनिजय आशिया या निर्मितीसंस्थेने केली आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘होस्टेजेस' ही सिरीज चर्चेचा विषय बनली होती. ही अतिशय रोमांचकारी सिरीज प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. रोनित रॉयने उडान, २ स्टेट्स, काबिल, अदालत यांसारख्या अनेक चित्रपटांत आणि छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात अद्वितीय परफॉर्मन्स दिल्यानंतर आता ‘होस्टेजेस’ या सिरीजच्या माध्यमातून डिजिटल मनोरंजन माध्यमांतही आपला ठसा उमटवण्यासाठी कंबर कसली आहे. तारें जमीन पर, रहस्य, घायल वन्स अगेन या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारी तिस्का चोप्राही या सिरीजमधून पुन्हा प्रेक्षकांसमोर येते आहे. खोसला का घोसला, घनचक्कर आणि इंदू सरकारमधील अभिनेता प्रविण दबास यानेही यापूर्वी आपल्‌या उत्कृष्ट कामामुळे रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या सिरीजमध्येही प्रविण महत्वपूर्ण पात्र रंगवताना आपल्याला दिसणार आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहिल होस्टेजेसमध्ये आपल्यासमोर येणार आहेत. तसेच, हजारो ख्वाईशें ऐसी, चमेली, खोया खोया चांद आणि आता नव्याने प्रदर्शित झालेल्या दास देव या चित्रपटांचे निर्माते सुधीर मिश्रा यांनी होस्टेजेसच्या माध्यमातून वेब सिरीज दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पहिलेच पाऊल टाकले आहे.

अॅपलॉज एण्टरटेन्मेंटचे सीईओ समीर नायर म्हणाले, "प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी, रोमांचकारी संकल्पना होस्टेजेसमधून मांडण्यात आली आहे. डिजिटल व्यासपिठावर अशाप्रकारच्या मालिकांना मोठी मागणी असून सुधीर मिश्रा यांच्यासारख्या उत्तम दिग्दर्शकाची व दीपक धरसारख्या अद्वितीय निर्मात्यामुळे ही मालिका नक्कीच यशस्वी होऊ शकेल. रोनित रॉय, तिस्का, प्रविण आणि दिलीप यांच्या अभिनयाने रंगलेली ही प्रिमीयम कॉन्स्पिरसी सिरीज प्रेक्षकांची मने जिंकून घेईल आणि नवी उंची गाठेल, यात शंका नाही." बनिजय आशियाचे संस्थापक व सीईओ दीपक धर म्हणाले, "माझ्यावर व माझ्या मेहनतीवर समीरने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी खूप ऋणी आणि आनंदी आहे. होस्टेजेस या प्रेक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरलेल्या मौल्यवान आतंरराष्ट्रीय कलाकृतीसाठी अॅपलॉज एण्टरटेन्मेंटशी भागीदारी करून बनिजय आशियाला फार आनंद झाला आहे. समीर नायर आणि बनिजय समुह एकत्र आल्यामुळे, प्रेक्षकांसाठी अद्वितीय संहिता निर्माण करण्याचे ध्येय आम्ही बाळगतो आहोत."

होस्टेजेसचे दिग्दर्शक सुधीर मिश्रा म्हणाले, "माझा प्रत्येक चित्रपट किंवा शो हा माझ्यासाठी पहिलाच असल्यासारखे मी मानतो. यामुळे नवीन आणि ताज्या पद्धतीने मी त्या संकल्पनेकडे पाहू शकतो. होस्टेजेस हे त्याचेच एक उदाहरण आहे. माझ्यासाठी या कलाकृतीत सहभागी असलेली प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक घटक हा त्या कलाकृतीचा अविभाज्य भाग असतो. मग ते कलाकार असोत, निर्माते किंवा लेखक असोत वा कॅमेरामन किंवा पूर्ण टीम असो. होस्टेजेस या सिरीजला समीर नायर यांची कल्पकता लाभली असून अद्वितीय कलाकार व लेखक या सिरीजमध्ये असल्‌यामुळे तिचे दिग्दर्शन करताना मलाही मजा येते आहे."रोनित रॉय म्हणाला, "होस्टेजेस हा शो मी जेव्हा प्रथम सीनवर पाहिला, तेव्हा मी तिथेच जखडला गेलो. जगभर या सिरीजला लोकप्रियता लाभली आहे आणि या मालिकेतील माझे पात्र फारच वैचित्र्यपूर्ण आहे. माझ्या प्रत्येक परफॉर्मन्समधून माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन होईल, प्रेक्षक एकरूप होतील, असा माझा प्रयत्न असतो. या सिरीजसाठी सुधीर मिश्रांसारख्या उत्कृष्ट दिग्दर्शकासोबत काम करताना मला आनंद होतो आहे."

तिस्का चोप्रा म्हणाली, "या सिरीजमधील माझे पात्र फार वेगळे आहे. मूळ सिरीजने उंचावून ठेवलेल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे आहे. परंतु, सुधीर मिश्रांसारखे दिग्दर्शक आणि इतके मोठे कलाकार सोबत असताना आमचा हा प्रवास नक्कीच यशस्वी होईल, अशी मला खात्री आहे. अशाप्रकारचा शो यापूर्वी कधीच झालेला नाही आणि भारतीय डिजिटल मनोरंजनाला होस्टेजेस या सिरीजमुळे वेगळे वळण लाभणार आहे, हे नक्की."

प्रविण दबास म्हणाला, "विविध पात्रे वठवताना मला धोका पत्करायला आवडतो आणि होस्टेजेसमधील माझे पात्र हे माझ्यासाठी आव्हान होते. होस्टेजेसची संहिता अंगावर काटा आणणारी असून सुधीर मिश्रांसारख्या दिग्दर्शकांकडून माझ्या कामाचे परिक्षण होते आहे व रोनित रॉय आणि तिस्का चोप्रासारखे कलाकार या सिरीजमध्ये माझ्यासोबत आहेत, ही गोष्ट माझ्यासाठी फारच रोमांचक आहे."होस्टेजेस या सिरीजचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू असून मल्हार राठोड, शरद जोशी, आशिम गुलाटी, सुर्या शर्मा आणि अनांगशा बिस्वास हे अन्य कलाकार या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. यंदाच्या वर्षाच्या उत्तरार्धात ही सिरीज प्रसारित होण्याची अपेक्षा आहे.हंन्सल मेहता यांची द स्कॅम, बीबीसीसोबत क्रिमीनल जस्टीस आणि द ऑफीस तसेच, नागेश कुक्कूनूर यांच्यासोबत सीटी ऑफ ड्रीम्स या अग्रेसर वेब सिरीजसह आणखी २० प्रिमीयम शो यावर्षीसाठी अॅपलॉज एण्टरटेन्मेंटच्या यादीत आहेत. होस्टेजेस सिरीजच्या घोषणेतून, अॅपलॉज एण्टरटेन्मेंटने प्रेक्षकांना आणखी एका नव्याकोर्‍या मनोरंजक शोची आशा प्रेक्षकांच्या मनात जागवली असून तिचे प्रदर्शन होण्यासाठी आता आम्ही उत्सुक झालो आहोत.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :