'कलीरें'मध्ये शिल्पा सकलानी बनणार खलनायिका

मिसेस कपूरच्या रूपात टेलिव्हिजनवरील लाडकी अभिनेत्री शिल्पा सकलानी प्रवेश करत आहे.

'कलीरें'मध्ये शिल्पा सकलानी बनणार खलनायिका
Published: 17 Apr 2018 02:22 PM  Updated: 17 Apr 2018 02:22 PM

एका खंबीर मुलगी मीरा अदिती शर्माची जी पंजाबमध्ये नाक्यानाक्यावर उघडत असलेल्या ब्राईड ग्रूमिंग स्कूल्सच्या पार्श्वभूमीवर आपले वेगळेपण सिद्ध करण्यासाठी झटत आहे.नुकत्याच काही भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की मीरा आणि सुमेर परमवीर सिंग चीमा यांचे लग्न त्यांचे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असल्यामुळे मोडते.ते संपतासंपताच काही अनाकलनीय घटनांमुळे मीरा आणि विवान अरिजित तनेजा यांना एकमेकांसमोर जबरदस्ती लग्न करावे लागते. ह्या वळणानंतर मीराच्या आयुष्यात सगळं काही ठीक होत असतानाच विवानची सावत्र आई मिसेस कपूरच्या प्रवेशामुळे ह्या मालिकेत मोठे नाट्‌य पाहायला मिळेल. मिसेस कपूरच्या रूपात टेलिव्हिजनवरील लाडकी अभिनेत्री शिल्पा सकलानी प्रवेश करत आहे.शिल्पा सकलानी ऊर्फ मिसेस कपूर यांनी विवानला त्याच्या आयुष्यात मार्गदर्शन केले असून कपूर बिझनेस एम्पायर प्रस्थापित करण्यासाठीही मदत केली आहे.आपल्या व्यक्तिरेखेबद्दल शिल्पा म्हणाली, “मिसेस कपूर ही कलीरेंमधील खलनायिका आहे. तिने विवानला कपूर बिझनेस एम्पायर जागतिक स्तरावर उभारण्यासाठी मदत केली असली तरी तिचा स्वतःच्या त्यामागे स्वार्थी हेतू आहे. त्यांचे नाते अतिशय प्रोफेशनल असून त्यात नातेसंबंधांना जागा नाही. माझ्या ह्या शोमधील प्रवेशामुळे ह्या नवविवाहीत दाम्पत्यामध्ये समस्या निर्माण होतील.आताच खरे नाट्‌यमय वळण सुरू होत आहे.”आपण हा प्रोजेक्ट का स्वीकारला याबद्दल ती म्हणाली, टेलिव्हिजनवर काम करण्यासाठी मला माझ्या पतीने प्रोत्साहन दिले.मला आवडतील अशाच भूमिका मी करणार आहे.मिसेस कपूर ह्या भूमिकेला कलीरेंमध्ये खलनायकी छटा असून ते मला आवडले.मग आता मिसेस कपूर विवान आणि मीराच्या अपघातानेच झालेल्या लग्नात काय समस्या निर्माण करतील? या सगळ्यां गोष्टी पाहणे रंजक ठरणार आहे. 

‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटात अभिनेत्री कॅटरिना कैफने साकारलेल्या वधूसारखीच व्यक्तिरेखा या मालिकेत अदितीने रंगविली आहे. मीरा ही एक स्वच्छंदी आणि आनंदी स्वभावाची मुलगी असून तिला भारतीय परंपरेच्या चोकटीतील वधू बनण्यात स्वारस्य नसते. तिला तिचे जीवन मुक्तपणे आणि आपल्या मर्जीनुसार जगायचे असते. मीरा ती स्पष्टवक्ती असून तिला आपले व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कोणासाठी किंवा सामाजिक दबावामुळे बदलण्याची इच्छा नसते. सुमेरबरोबरच्या लग्नाची तारीख जसजशी जवळ येते, तशी मीराला सुमेरच्या व्यक्तिमत्त्वाची काळी बाजू दिसून येते. त्यामुळे ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटात अभिनेत्री कॅटरिना कैफने ज्याप्रमाणे मोटाररबाईकवरून लग्नापूर्वी पलायन करते, तसेच मीराही करते. अतिशय भरजरी लालभडक रंगाचा लेहेंगा परिधान केलेली मीरा वधूचा चूडा आणि कलीरें अंगावर असतानाच सुमेरच्या तावडीतून सुटण्यासाठी लग्नमंडपडातून पलायन करते.मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :