SEE PICS:''लागिर झालं जी' मालिकेने केले 300 एपिसोड्स पूर्ण, सेलिब्रेशनवेळी कलाकारांचा असा होता अंदाज

300 एपिसोड्सचा टप्पा पार केलेल्या या मालिकेचे 1000 एपिसोडस होवोत अशाच सा-यांनी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळत आहे.नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस ही मालिका रोमांचक आणि रंजक बनत चालली आहे. घराघरात प्रत्येकाला ही मालिका चांगलीच भावते आहे.

SEE PICS:''लागिर झालं जी' मालिकेने केले 300 एपिसोड्स पूर्ण, सेलिब्रेशनवेळी कलाकारांचा असा होता अंदाज
Published: 16 Apr 2018 11:14 AM  Updated: 16 Apr 2018 11:14 AM

'लागिरं झालं जी' या मालिकेने छोट्या पडद्यावर एंट्री करताच अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली.पहिल्या एपिसोडपासून सुरू झालेला या मालिकेचा छोट्या पडद्यावरचा प्रवास आता बघता बघता 300 एपिसोडपर्यंत येऊन पोहचला आहे.या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील शीतली आणि अजिंक्य म्हणजेच अज्या हे दोघे तर प्रेक्षकांचे प्रचंड लाडके बनले आहेत. या मालिकेत प्रेक्षकांना अज्या आणि शीतलीची प्रेमकथा पाहायला मिळत आहे.रसिकांनी दिलेल्या भरघोस पसंतीमुळेच ही मालिका टीआरपी रेटींगमध्येही अव्वल आहे.'लागिर झालं जी'ने नुकतेच 300 एपिसोड्स पूर्ण केले आहेत.यानिमित्ताने टीमच्या सर्व कलाकारांनी एकत्र येत केक कटींग करत जंगी सेलिब्रेशन केले.मालिकेच्या कलाकारांनीच या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.तसेच 300 एपिसोड्सचा टप्पा पार केलेल्या या मालिकेचे 1000 एपिसोडस होवोत अशाच सा-यांनी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळत आहे.नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस ही मालिका रोमांचक आणि रंजक बनत चालली आहे. घराघरात प्रत्येकाला ही मालिका चांगलीच भावते आहे.


Also Read:'लागीरं झालं जी' या मालिकेतील जयश्री म्हणजेच किरण ढाने खऱ्या आयुष्यात आहे एकदम ग्लॅमरस

या मालिकेत किरण ढाने प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.किरण या मालिकेत जयश्री म्हणजेच जयडीची भूमिका साकारत आहे.'लागीरं झालं जी' या मालिकेत बहुतेक सर्व कलाकार याच भागातले स्थानिक कलाकार आहेत.किरण देखील साताऱ्यात राहाणारी आहे.ती तेथील कॉलेजमधून शिक्षण घेत आहे.या मालिकेत अगदी साधी भोळी दिसणारी किरण ही तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.ती लागीरं झालं जी या मालिकेत नेहमीच पंजाबी ड्रेसमध्ये पाहायला मिळते. तसेच या मालिकेत ती केसांची वेणी घालते.पण खऱ्या आयुष्यात ती वेस्टर्न कपडे घालते तसेच अनेक वेळा तिचे केस मोकळेच असतात.किरण तिच्या जयश्री या व्यक्तिरेखेपेक्षा खऱ्या आयुष्यात खूपच वेगळी दिसते.त्यामुळे खऱ्या आयुष्यात किरण तुमच्यासमोर आली तर तुम्ही नक्कीच तिला ओळखू शकणार नाही याची आम्हाला खात्री आहे. मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :