साहिल उप्पल, समरिध बावा, झिनल बेलाणी, आदिती शर्मा, फरनाझ शेट्टी आणि श्वेता बासू यांना झाली सेटवर दुखापत

मालिकेच्या सेटवर कलाकारांना दुखापत होण्याची संख्या वाढली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. साहिल उप्पल, समरिध बावा, झिनल बेलाणी, आदिती शर्मा, फरनाझ शेट्टी आणि श्वेता बासू यांसारख्या अनेक कलाकारांना आतापर्यंत सेटवर दुखापत झाली आहे.

साहिल उप्पल, समरिध बावा,  झिनल बेलाणी,  आदिती शर्मा, फरनाझ शेट्टी आणि श्वेता बासू यांना झाली सेटवर दुखापत
Published: 08 Apr 2017 06:32 PM  Updated: 08 Apr 2017 06:32 PM

मालिकांचे चित्रीकरण करत असताना अपघात होणे हे आता काही नवीन राहिलेले नाही. गेल्या काही दिवसांत अनेक मालिकांच्या सेटवर अपघात झाले असून यात अनेक कलाकारांना दुखापतदेखील झाली आहे. जाणून घेऊया कोणत्या कोणत्या कलाकारांना झाली दुखापत...

साहिल उप्पल आणि समरिध बावा
एक श्रृंगार... स्वाभिमान या मालिकेत साहिल उप्पल कुणाल तर समरिध बावा करण ही भूमिका साकारत आहे. या मालिकेसाठी एक हाणामारीचे दृश्य चित्रीत करत असताना समरिध आणि साहिल यांना चांगलीच दुखापत झाली. दृश्याच्या मागणीनुसार समरिधने टेबलवर पडणे गरजेचे होते. पण चित्रीकरण करत असताना समरिध अभिनय करण्यात पूर्णपणे तल्लीन झाला असल्याने तो टेबलवर आपटण्याऐवजी जमिनीवर आदळला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच एका दृश्यात साहिलला ढकलले जाणार होते. पण चित्रीकरण्याच्यावेळी त्याला खूपच जोरात ढकलले गेले. त्यामुळे त्याचे डोके कॅमेऱ्यावर आदळले. साहिल आणि समरिध या दोघांच्याही डोक्याला चांगलेच लागले होते.

samridh bawa

झिनल बेलाणी
हर मर्द का दर्द या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झिनल जिन्यावरून घसरून पडल्याने चित्रीकरण काही काळ खोळंबले होते. तिचा पाय घसरल्याने ती जिन्यावरून पडली. सुरुवातीला तिला जबर मार बसला आहे असे कोणाला वाटलेच नाही; परंतु डॉक्टरांना बोलवल्यानंतर त्यांनी तिला तीन दिवस सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले. तिच्या गुडघ्याला खरचटले असल्याने तीन-चार दिवस तरी कोणतेही शारीरिक कष्टाचे काम करण्यास मनाई करण्यात आली होती.

jinal belani

आदिती शर्मा
गंगा या मालिकेतील एका दृश्याचे चित्रीकरण करत असताना एका दिव्यामुळे तिच्या साडीला आग लागली होती. गंगा शंकराची पूजा करते अशा दृश्याचे चित्रीकरण सुरू असताना हा अपघात घडला. या दृश्यासाठी संपूर्ण मंदिर दिव्यांनी सजवले होते आणि एका दिव्याच्या खूपच जवळ आदिती उभी होती. त्याचवेळी तिच्या साडीला आग लागली. यामुळे काही वेळासाठी सेटवर खूपच तंग वातावरण निर्माण झाले होते आणि त्यामुळे चित्रीकरणदेखील थांबवण्यात आले होते. पण प्रोडक्शन टीममधील लोकांनी क्षणात ती आग विझवल्यामुळे आदितीला किंवा या टीममधील कोणालाही दुखापत झाली नाही.

aditi sharma

फरनाझ शेट्टी
वारिस या मालिकेच्या प्रोमोचे चित्रीकरण करण्यासाठी फरनाझला घोड्यावर बसायचे होते. पण आजूबाजूला खूप ढोल ताशे वाजत असल्याने या आवाजामुळे घोडा चवथळला आणि त्याने फरनाझच्या पायावर अनेकवेळा पाय दिला. खरे तर तिच्या पायाला आधीपासूनच लागले असल्यामुळे तिला खूपच त्रास होत होता. पण त्याही अवस्थेतही तिने घोड्याला शांत केले आणि ते चित्रीकरण पूर्ण केले.

farnaz shetty

श्वेता बासू प्रसाद
चंद्र नंदिनी या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना श्वेता बासू प्रसाद पायऱ्यांवरून जोरात आपटली. या सेटवर असलेल्या काही दिव्यातून झिरपणारे तेल पायऱ्यांवर सांडले होते. ते तिच्या लक्षात न आल्याने ती पायऱ्यांवरून उतरत होती. त्याचवेळी तिचा पाय घसरून ती जोरात आपटली. यामुळे तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तसेच तिचा डोळादेखील सुजला होता. 

shweta basu prasad


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :