murder case :​कृतिका चौधरीसोबत झाला होता मोठा धोका! वाचून बसेल धक्का!!

अभिनेत्री कृतिका चौधरी हिच्या हत्या प्रकरणावरून पडदा उठलाय. प्राथमिक चौकशीअंती पोलिसांनी कृतिकाचा पूर्वाश्रमीचा पती विजय द्विवेदी याला आरोपी बनवले आहे.

murder case :​कृतिका चौधरीसोबत झाला होता मोठा धोका! वाचून बसेल धक्का!!
Published: 15 Jun 2017 01:31 PM  Updated: 15 Jun 2017 01:31 PM

अभिनेत्री कृतिका चौधरी हिच्या हत्या प्रकरणावरून पडदा उठलाय.  डोक्यावर मार लागल्याने कृतिकाचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. तूर्तास पोलिस या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि प्राथमिक चौकशीअंती पोलिसांनी कृतिकाचा पूर्वाश्रमीचा पती विजय द्विवेदी याला आरोपी बनवले आहे.
विजयने कृतिकाला फसवले, असे चौकशीतून समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या एका सूत्राने कृतिकाची एक दुदैवी कथा सांगितली आहे. होय, बॉलिवूडमध्ये मोठे रोल देण्याचे आमीष दाखवून विजयने कृतिकाला मुंबईत आणले होते. मी जनार्दन द्विवेदी या काँग्रेस नेत्याचा पुतण्या आहे, असे सांगून विजयने कृतिकाला आपल्या जाळ्यात ओढले. माझे हायप्रोफाईल लोकांशी संबंध आहेत. मी तुला बॉलिवूडमध्ये काम मिळवून देईल, असे त्याने सांगितले. विजयच्या या बोलण्यावर विश्वास ठेवणेच कृतिकाला महागात पडले. कृतिकाशी लग्न केल्यानंतर विजयने आपल्या पहिल्या पत्नीला सोडले. पण २०१२ मध्ये विजयचे बिंग फुटले. काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून एक व्यक्ती आपल्या नावाने लोकांची फसवणूक करत असल्याची तक्रार केली. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला. यानंतर विजयला लोखंडवाला परिसरातून अटक करण्यात आली होती. विजयला अटक झाली त्यावेळी कृतिका त्याच्यासोबत होती. या घटनेने कृतिकाला मोठा धक्का बसला. आपण फसवले गेलोत, हे कृतिकाच्या लक्षात आले. यानंतर तिने विजयपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर कृतिका बराच काळ डिप्रेशनमध्ये होती. पण कालांतराने ती बाहेर आली व तिने तिचे लक्ष तिच्या करिअरवर फोकस केले. पण लक्ष्य गाठण्याआधीच कृतिकाला आयुष्यातून उठवण्यात आले.
सोमवारी मुंबईच्या अंधेरीमधील चार बंग्लो परिसरातील भैरवनाथ बिल्डींगमध्ये   कृतिका चौधरीचा आढळला होता. कृतिका घरात एकटीच राहायची. घरातून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाºयांनी पोलिसांना माहिती दिली होती. पोलिस दरवाजा तोडून आत पोहोचले तेव्हा टीव्ही व एसी आॅन होता. बाजूलाच कृतिकाचा मृतदेह पडला होता.   

ALSO READ : कृतिका चौधरीची हत्याच; दया नायक करणार तपास!

 कृतिका ही मूळची उत्तराखंडच्या हरिद्वारची होती. यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते आणि यासाठीच ती मुंबईत आली होती. कृतिका ही मूळची उत्तराखंडच्या हरिद्वारची. ‘रज्जो’ या चित्रपटात तिने कंगना राणौतसोबत काम केले होते. याशिवाय २०११ मध्ये बालाजी टेलिफिल्मच्या ‘परिचय’ या मालिकेतही ती दिसली होती.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :