'मेरी हानिकारक बीवी'मध्ये जिया शंकरने घेतली करीना कपूरकडून प्रेरणा

अनेक मालिकांमध्ये झळकलेला नासिर खान सुद्धा या मालिकेमध्‍ये असणार आहे. 'बागबान' आणि 'वझीर' यांसारख्‍या सुपरहिट बॉलिवुड चित्रपटांमध्‍ये दिसलेला हा अभिनेता मेरी हानिकारक बीवी या मालिकेमध्ये अखिलेशच्‍या वडिलांची म्हणजेच ब्रिजेशची भूमिका साकारणार आहे.

'मेरी हानिकारक बीवी'मध्ये जिया शंकरने घेतली करीना कपूरकडून प्रेरणा
Published: 12 Dec 2017 12:05 PM  Updated: 12 Dec 2017 12:05 PM

आपल्या वेगळ्या संकल्पना आणि गमतीशीर प्रोमोजमुळे सध्या 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेची चर्चा आहे. नसबंदी हे मालिकेचे ठळक वैशिष्ट्य असून अखिलेश (करण सूचकद्वारे) आणि डॉ. ईरा (अभिनीत व्यक्तिरेखा) यांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा आहे.यातील व्यक्तिरेखेत खास वैशिष्टय आहेत.मालिकेतील व्यक्तिरेखा या  बॉलिवुडमधील काही व्यक्तिरेखांशी साधर्म्य असणा-या आहेत.डॉ. ईरा देसाईच्या भूमिकेत दिसणार्‍या जिया शंकरची व्यक्तिरेखा ही ‘3 इडियट्स’ या लोकप्रिय सिनेमातील करिना कपूरच्या पिया सहस्त्रबुद्धे या व्यक्तिरेखेशी मिळतीजुळती आहे.डॉ. पियाप्रमाणेच या मालिकेत डॉ. ईरा ही हुशार, कठोर मनाची आणि व्यावहारिक मुलगी आहे.लोकसंख्येवर नियंत्रण असावे अशी तिची स्वतःची धारणा असते.अखिलेश पांडे तिच्या आयुष्यात येतो आणि त्यांच्यामध्ये ज्याप्रकारे गैरसमज निर्माण होतात तिथून खर्‍या कथेला सुरुवात होते.यासंदर्भात जिया शंकरने सांगितले '3 इडियट्स’ मधील करीना कपूरच्या व्यक्तिरेखेची खरंच मी चाहती आहे आणि हा चित्रपट मी खूप वेळा पाहिला आहे.अखिलेशला भेटल्यानंतर त्याच्याबद्दल गैरसमज करून घेणार्‍या डॉ. ईराच्या भूमिकेबद्दल मला विचारण्यात आले, तेव्हा लगेच मला करिनाची ही भूमिका आठवली. त्यानंतर मी तिची ही भूमिकेचा करिनाने कशी रंगवली आहे त्यासाठी अनेकवेळी मला हा चित्रपटही पाहावा लागला. करिना सारखी भूमिका केली नसली तरी चांगली भूमिका साकारण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.रसिकांना ही मालिका आवडेल आणि माझ्या भूमिकाही त्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल अशी मला आशा असल्याचे तिने सांगितले.”

कॉमेडी आणि ड्रामाने परिपूर्ण अशी मालिका आहे.मुळात नसबंदी या प्रमुख विषयावर फोकस करण्‍यात आले आहे.त्यामुळे मालिका रसिकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरेन असा विश्वास निर्मांत्यांना आहे.नसबंदीवर भाष्य करणारी ही पहिलीच मालिका  आहे.या मालिकेत यांच्यासोबतच छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहे.अनेक मालिकांमध्ये झळकलेला नासिर खान सुद्धा या मालिकेमध्‍ये असणार आहे. 'बागबान' आणि 'वझीर' यांसारख्‍या सुपरहिट बॉलिवुड चित्रपटांमध्‍ये दिसलेला हा अभिनेता 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेमध्ये अखिलेशच्‍या वडिलांची म्हणजेच ब्रिजेशची भूमिका साकारणार आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :