'जमाई राजा' फेम रवी दुबेने दिली मालिकेच्या टीमला पार्टी

'जमाई राजा'च्या टीमने काल 701 भागाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर मालिकेच्या क्रु मेंबरसह कालाकारांनी जंगी सेलिब्रेशन केले. मालिकेच्या शेवटचा भागाचे शूटिंग करण्यात येत असल्यामुळे मालिकेच्या सेटवर सगळेच भावूक झाले होते.

'जमाई राजा' फेम रवी दुबेने दिली मालिकेच्या टीमला पार्टी
Published: 03 Mar 2017 02:10 PM  Updated: 03 Mar 2017 02:10 PM

'जमाई राजा'च्या टीमने काल 701 भागाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर  मालिकेच्या क्रु मेंबरसह कालाकारांनी  जंगी सेलिब्रेशन केले. मालिकेच्या शेवटचा भागाचे शूटिंग करण्यात येत असल्यामुळे मालिकेच्या सेटवर सगळेच भावूक झाले होते. 2014 पासून संपूर्ण टीमचे एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा रवी दुबेने कलाकार,तंत्रज्ञ या सगळ्या टीमला मोठी पार्टी दिली.मालिकेच्या पहिल्या भागापासूनच मालिकेच्या सेटवर अगदी खेळीमेळीचे वातावरण असायचे. कितीही काम असले कितीही उशिरा शूटिंग संपत असले तरही कलाकार असो किंवा क्रु मेंबर कोणीही कंटाळा करायचे नाही.वातावर अगदी मनमोकळे,खेळीमेळीचे असल्यामुळे सगळेजण आपले काम एन्जॉय करायचे. शेवटाच्या भागाच्या शूटिंगवेळी आता पुन्हा सगळे एकत्र कधी भेटणार? याच प्रश्नाने भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आयुष्यात पुढे एक गोष्ट संपली की तिथूनच दुस-या नव्या गोष्टीची सुरूवात होत असते हाच विचार करत शूटिंग करत पार्टी  एंन्जॉय करत सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विशेष म्हणजे सेटवर वातावरण अगदीच भावूक झाल्याचे पाहून रवी दुबेने सगळ्यांच्या चेह-यावर हसु उमलण्यासाठी सैराट सिनेमातील 'झिंगाट' गाण्यावर डान्स करायला भागही पाडले. त्यामुळे सेटवर या सगळ्यांनी मिळून खूप सारी धमाल मस्ती करत हा शेटच्या भागाचेही शूटिंग सगळ्यांसाठी आनंदाचा ठरला.गेली 4 वर्ष आम्ही रसिकांचे मनोरंजन करत आहोत. या मालिकेमुळे घराघरांत आम्ही पोहचलो. रसिकांचे भरभरून मिळणारे प्रेम आणि आशिर्वाद यांमुळेच या मालिकेला यश मिळाले. रसिकांचे हेच आशिर्वाद आणि प्रेम घेवून आम्ही पुढच्या प्रवासाची सुरूवात करणार आहोत.पुन्हा एकदा रवी दुबे रसिकांच्या भेटीला नक्की येणार असे विश्वास देत आज अलविदा घेत असल्याचे त्याने म्हटले आहे. 
 

सरोगसी पद्धतीने कुंवारा बाप होण्याचा बॉलिवूडमध्ये ट्रेंड आला आहे का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :