'तुझं माझं ब्रेकअप' मालिका एका नव्या वळणावर,घेणार सहा महिन्यांचा लीप

मेनका समीरच्या आयुष्यात आल्यावर समीर आणि मीरा मध्ये गैरसमज वाढत गेले हे गैरसमज वाढवण्यात समीरच्या आईचा सुद्धा हात होता,अखेर या दोघांचा ब्रेकअप होणार आहे.

'तुझं माझं ब्रेकअप' मालिका एका नव्या वळणावर,घेणार सहा महिन्यांचा लीप
Published: 17 Mar 2018 12:12 PM  Updated: 17 Mar 2018 12:12 PM

'तुझं माझं ब्रेक अप' या मालिकेत प्रेक्षकांना समीर आणि मीराची कथा पाहायला मिळत आहे.एकाच महाविद्यालयात शिकणारे हे दोघे जण. वर्गातील बाकावरून बागेतील बाकावर यांचे प्रेम कधी पोहचले हे त्यांनाही कळाले नाही. समीर हा देसाई कुटुंबाचा एकुलता एक लाडका सुपुत्र. विशेषतः आईचा लाडका. घराची श्रीमंती असल्याने हवं ते हवं तेव्हा त्याला हातात मिळतं. त्यामुळे वेगळ्या कष्टाची आणि शिस्तीची त्याला कधीच सवय लागली नाही. तर दुसरीकडे मीरा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिस्तबद्ध मुलगी. स्वतःचे काम स्वतः करणारी आणि कुणी काम करताना पसारा केला की त्याला धारेवर धरणारी.असे हे भिन्न स्वभावाचे दोन जीव एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यात आकंठ बुडतातही. असे म्हणतात की, प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसेच काहीसे यांच्या बाबतीतही होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रेम आणि आनंदात पार पडतात पण त्याचा गोडवा ओसरला की मग सुरू होते संसाराची तारेवरची कसरत.लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढायला लागतात आणि भांडायलाही लागतात.लग्नाआधी एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे आता एकमेकांनाच सहन करतायत की काय असे चित्र निर्माण होते आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जाते की, ते दोघे वेगळे होण्याचाही निर्णय घेतात.लग्नानंतर वर्षभरातच वेगळे झाल्यानंतर त्यांना एकमेकांची उणीव भासायला लागते आणि प्रेमाची जाणीवही व्हायला लागते.मग ते दोघे पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतात.घाईने प्रेमात पडणाऱ्या आणि घाईने लग्नाच्या गाठी जोडणाऱ्या जोडप्यांच्या सुखी संसाराची स्वप्नं अपेक्षांच्या कसोटीवर खरी उतरतात का? अशा सगळ्या गोष्टींना अधोरेखीत करणारी मजेदार गोष्ट तुझं माझं ब्रेकमध्ये दाखवण्यात आली आहे.मात्र आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे.समीर आणि मीरा या दोघांचा ब्रेकअप होणार आहे.मेनका समीरच्या आयुष्यात आल्यावर समीर आणि मीरा मध्ये गैरसमज वाढत गेले हे गैरसमज वाढवण्यात समीरच्या आईचा सुद्धा हात होता,अखेर या दोघांचा ब्रेकअप होणार आहे आणि याच ट्रॅकवर मालिका ६ महिन्यांचा लीप घेणार आहे.आता ६ महिन्यांनंतर या पुन्हा एक लव्ह स्टोरी सुरु होणार आहे यात समीरच्या आज्जीची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.मालिकेट येणारे नवीन वळणही रंजक ठरणार हे मात्र नक्की.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :