​तुझ्यात जीव रंगला मालिकेतील लाडूच्या खऱ्या फॅमिलेचे फोटो तुम्ही पाहिले का?

​तुझ्यात जीव रंगला या मालिकेत लाडूची एंट्री झाल्यापासून हा मुलगा कोण आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. लाडूचे आई-वडील कोण आहेत, तो मुळचा कुठला आहे, तो कोणत्या इयत्तेत आहे असे अनेक प्रश्न सध्या लाडूच्या चाहत्यांना पडलेले आहेत.

​तुझ्यात जीव रंगला मालिकेतील लाडूच्या खऱ्या फॅमिलेचे फोटो तुम्ही पाहिले का?
Published: 09 Jun 2018 03:28 PM  Updated: 09 Jun 2018 03:28 PM

तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. या मालिकेचा टिआरपी अचानक वाढण्यामागे एक खास कारण आहे. या मालिकेत काहीच दिवसांपूर्वी लाडू या छोट्याशा मुलाची एंट्री झाली आहे. त्याच्या एंट्रीनंतर या मालिकेच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. लालूचे दिसणे, त्याचे बोलणे हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत लाडूची एंट्री झाल्यापासून हा मुलगा कोण आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. लाडूचे आई-वडील कोण आहेत, तो मुळचा कुठला आहे, तो कोणत्या इयत्तेत आहे असे अनेक प्रश्न सध्या लाडूच्या चाहत्यांना पडलेले आहेत. 
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राजवीर म्हणजे लाडू याचं खरं नाव राजवीरसिंह रणजीत गायकवाड आहे. राजवीरसिंहचा जन्म २२ ऑक्टोबर २०१३ साली सांगली येथे झाला असून आता तो आता ४ वर्षांचा आहे. राजवीरसिंहचे वडील रणजीत गायकवाड हे प्रसिद्ध लिफ्टिंग चॅम्पियन आहेत. वेट लिफ्टिंग मध्ये त्यांनी सलग ५२ राज्यस्तरीय आणि १० राष्ट्रीय तसेच अनेक इंटरनॅशनल स्पर्धा खेळल्या आहेत. त्यात त्यांना अनेकदा गोल्ड मेडल देखील मिळाले आहे. त्यानंतर भारतीय सेनेत त्यांनी मानाची नोकरी पत्करली तर आई पल्लवी रणजित गायकवाड या एम. कॉम आणि एम. बी. ए. इन फायनान्स मधून पदवीधर आहेत. काही काळ त्या सांगली जिल्हामध्यवर्ती बँकेत अकाऊंटण्टही होत्या. पण सध्या राजीवरच्या उज्वल भविष्यासाठी कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या आहेत. ‘लाडू’ चे आजोबा विठ्ठल कृष्णा गायकवाड हे देखील प्रसिद्ध कुस्ती पैलवान होते. विठ्ठल गायकवाड वस्ताद हे सांगली जिल्ह्यातील कसबे डीग्रज गावात टेलिफोन खात्याचे कर्मचारी होते. टेलिफोन कुस्ती स्पर्धेत विठ्ठल गायकवाड यांचं नाव नेहमीच अग्रस्थानी असायचे. साधारण चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. आपल्या मुलाने आपल्यासारखेच कुस्तीत नाव कमवावे असे त्यांना नेहमी वाटायचे. त्यांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा नातू म्हणजेच आपला लाडका लाडू कोल्हापुरात दाखल झाला. लाडू हा सध्या मोतीबाग तालीम येथून कुस्तीचे धडे घेत असून त्याचे वजन जवळजवळ २५ किलो आहे. कोल्हापुरातील ‘लिट्ल वंडर स्कूल’ मध्ये तो शिकत आहे. 

tuzyat jiv rangala ladoo family images

Also Read : सुयश टिळकने तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधरला दिल्या अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :