तर असा असणार बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस!

समाजाच्या आरशात बिग बॉस मराठीच्या सदस्यांची काय नवी प्रतिमा तयार झाली आहे हे हर्षदाला सदस्यांना सांगायचे होते.हर्षदाला या कार्या दरम्यान सकारात्मक आणि नकारात्मक मतं बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना सांगायची होती. हा टास्क आज देखील सुरु राहणार आहे. तसेच बिग बॉस आज घरातील स्पर्धकांना अजून एक कार्य देणार आहेत.कार्य कॅप्टनशी निगडीत असून कोण घराचा नवा कॅप्टन बनणार हे बघणे रंजक असणार आहे.

तर असा असणार बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस!
Published: 18 May 2018 10:57 AM  Updated: 18 May 2018 10:57 AM

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सगळ्या स्पर्धकांना सरप्राईझ मिळाले कारण महाराष्ट्राची लाडकी हर्षदा खानविलकरची घरामध्ये एन्ट्री झाली.यावेळी सा-यांनीच हर्षदाचे मोठ्या आनंदाने स्वागत कले.तसेच काल आस्ताद काळेला देखील सरप्राईझ मिळाले.आस्तादचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त त्याच्या आईने त्याच्यासाठी केक बनवून पाठवला होता. हर्षदा खानविलकर घरामध्ये आल्यानंतर बिग बॉसने हर्षदाला लगेचच एक कार्य दिले ज्याचे नाव होते “बिंब – प्रतिबिंब” ज्यामध्ये हर्षदा आरशाचे प्रतिनिधित्व करणार होती.तसेच ज्यामध्ये हर्षदाने आपली रोखठोक मत सदस्यांना सांगायची होती.आरसा कधीच खोट बोलत नाही तो खरं प्रतिबिंब दाखवतो.समाजाच्या आरशात बिग बॉस मराठीच्या सदस्यांची काय नवी प्रतिमा तयार झाली आहे हे हर्षदाला सदस्यांना सांगायचे होते.हर्षदाला या कार्या दरम्यान सकारात्मक आणि नकारात्मक मतं बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना सांगायची होती.हा टास्क आज देखील सुरु राहणार आहे. तसेच बिग बॉस आज घरातील स्पर्धकांना अजून एक कार्य देणार आहेत.कार्य कॅप्टनशी निगडीत असून कोण घराचा नवा कॅप्टन बनणार हे बघणे रंजक असणार आहे. हर्षदाने राजेश आणि रेशम यांना कठोर शब्दांमध्ये त्यांचे घरामध्ये जे काही सुरु आहे त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, या दोघांना देखील त्यामध्ये काही गैर वाटत नाही असे त्यांनी दिलेल्या कार्या दरम्यान बोलून दाखविले.यानंतर हर्षदाने  मेघा, सई, जुई, स्मिता यांनादेखील त्या कुठे चुकत आहेत, कुठे त्यांना संयम दाखविण्याची गरज आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.आज घरामध्ये रंगणार आहे कॅप्टनसीचा टास्क.ज्याप्रमाणे फुले कुठलाही भेद न बाळगता सर्वांना एक सारखा सुगंध देतात.अगदी त्याचप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरातील कॅप्टनने सर्वांना एक समान न्याय देणे, आनंद देणे अपेक्षित आहे.म्हणूनच सदस्यांमधील वेगवेगळ्या रंगाची पारख करण्यासाठी बिग बॉस सदस्यांना “रंग माझा वेगळा” हे कॅप्टनसीचे कार्य देणार आहेत. कॅप्टनसीसाठी पात्र असलेल्या दोन उमेदवारांनी आपली छानशी फुलांची बाग तयार करायची आहे.बागेमध्ये स्वत:ची फुले रोवून बाग सजवायची आहे.त्या उमेदवाराचे समर्थक त्यांच्यासोबतच उभे असणार आहेत. तर बाकीच्या सदस्यांना आपल्या आवडत्या उमेदवाराच्या रंगीत फुलांची बाग जपायची आहे.पुष्कर आणि सुशांत हे दोघेही कॅप्टनसीसाठी या आठवड्यामधील उमेदवार असून ते ही बाग आज सजवणार आहेत.तसेच या टास्क दरम्यान राजेश आणि सुशांत मिळालेल्या पॉवरचा वापर करणार आहेत, ज्याला परवानगी नाहीये... बिग बॉसने वारंवार सूचना देऊनही दोघांकडून या नियमाचे उल्लंघन होणार आहे.हिंसेचा वापर केल्याने बिग बॉस राजेश आणि सुशांत या दोघांनाही कठोर आणि कडक शब्दांमध्ये त्याची जाणीव करून देणार असून हे दोघेही बिग बॉसच्या शिक्षेस पात्र असणार आहेत. बिग बॉसने घरातील सगळी कामे हे दोघे करणार असून त्यांना कोणीही मदत करू शकत नाही अशी सुचनाही करणार आहेत.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :