Bigg Boss 10 Ex- कंटेस्टंटने गुपचुप उरकले लग्न,समोर आले फोटो

खरंतर इंडस्ट्रीतील नावाजलेल्या अभिनेतापैकी एकआहे,मात्र त्याने त्याच्या लग्नाता सेलिब्रिटींनी आमंत्रित केले नाही.

Bigg Boss 10 Ex- कंटेस्टंटने गुपचुप उरकले लग्न,समोर आले फोटो
Published: 22 Feb 2018 10:39 AM  Updated: 22 Feb 2018 10:39 AM

'तेरे घर आया,मै आया तुझके लेके'म्हणत टीव्ही अभिनेता गौरव चोप्राने वयाच्या 38 व्या वर्षी गर्लफ्रेंड हितिशा चिरिन्द्रासोबत विवाहबंधनात अडकला आहे.विशेष म्हणजे गौरव चोप्राच्या लग्नाची कोणतची चर्चा नव्हती.तसेच गौरवने त्याच्या लग्नाला खूप कमी मित्रमंडळींना आमंत्रण दिले होते.नोएडा येथे मोठ्या थाटात हे लग्न पार पडले.खरंतर गौरवची चर्चा जास्त त्याच्या लव्हअफेरअमुळेच झाली.त्याचे प्रत्येक अफेअर हे खूप चर्चेत होते.मौनी रॉयबरोबर असलेले त्याचे रिलेशनमुळे तो तर खूप चर्चेत होता.विशेष म्हणजे मौनी रॉय आधी गौरव अभिनेत्री नारायणी शास्त्रीला डेट करत होता.इतकेच नाहीतर बिग बॉसच्या 10व्या सिझनमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.त्यावेळीही व्हीजे बानी जेसह त्याची वाढती जवळीक पाहता दोघांच्याही लव्ह अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. दोघेही एकमेकांसह वेळ घालवताना दिसायचे त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशाच चर्चा रंगायच्या. आता लग्नाची कुठेही चर्चा नसताना गौरवने थेट लग्न केल्याचे समोर आले आहे.हितीशाही मुळची दिल्लीची आहे.हितिशा आणि गौरव गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.अखेर त्यांनी त्यांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात केले.

वर-वधूच्या रुपात गौरव आणि हितिशा अतिशय सुंदर दिसले.हितिशाने लग्नात लाल रंगाच लहेंगा आणि गोल्ड ज्वेलरी घातली होती.तर गौरवने व्हाइट कलरच्या शेरवानीसोबत मरुन रंगाची शॉल घेतली होती.गौरवने अनेक टीव्ही शोजमध्ये अभिनय केला आहे.'डोली अरमानों की','लावण्या','पिया का घर','कभी हां कभी ना','घर की लक्ष्मी बेटियां','उतरन','ऐसा देस है मेरा'सह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये गौरव झळकला आहे.गौरवने इंडस्ट्रीतील एकाही मित्राला लग्नाला बोलावले नाही.त्यामुळे त्याचे जवळच्या मित्रांनीही त्याच्या लग्नाची बातमी कळताच त्यांना आनंद झाला असला तरीही गौरवने गुपचुप लग्न उरकल्यामुळे नाराजही आहेत.                   

Also Read:तुम्हाला माहीत आहे का की नारायणी शास्त्रीचे लग्न झालेले आहे?

नारायणी शास्त्री तिच्या मालिकांपेक्षा नेहमीच तिच्या वैयक्तिक जीवनामुळे अधिक चर्चेत राहिली आहे.गौरव चोप्रासोबतचे तिचे अफेअर तर प्रचंड गाजले होते. गौरव आणि तिचे ब्रेकअप झाल्यानंतर ते दोघे आजही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत.गेल्या चार वर्षांपासून टोनी या लंडनस्थित व्यक्तीशी नारायणी नात्यात आहे. तिने ही गोष्ट मीडियासमोर कबूलदेखील केली होती. टोनी अनेक वर्षांपासून भारतातच काम करत आहे. टोनी आणि नारायणी नात्यात असले तरी त्यांनी लग्नाचा विचार केला नव्हता. दिवसातील अनेक तास आम्ही एकमेकांसोबतच घालवत असतो. त्यामुळे लग्न करण्याची गरजच आहे असे तिचे म्हणणे होते. पण तिने वर्षभरापूर्वीच टोनीसोबत लग्न केले असल्याची बातमी नुकतीच आली आहे आणि नारायणीनेच ही गोष्ट मीडियाला सांगितली होती. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :