बिग बॉसच्या ११व्या पर्वामध्ये झळकणार हे सेलिब्रिटी

बिग बॉसच्या ११व्या पर्वामध्ये हे सेलिब्रिटी झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.

बिग बॉसच्या ११व्या पर्वामध्ये झळकणार हे सेलिब्रिटी
Published: 09 Sep 2017 01:54 PM  Updated: 09 Sep 2017 01:54 PM

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या ११व्या सिझनची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रिटी झळकणार याची उत्सुकता सर्वसामान्य लोकांना लागली आहे. या सिझनचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या नव्या पर्वाची थिम खूपच भन्नाट आहे. नव्या पर्वात शेजारी शेजारी अशी थिम असणार आहे. या नव्या पर्वात पुढील सेलिब्रिटी येण्याची शक्यता असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटने म्हटले आहे.

नीती टेलर
गुलाम या मालिकेमुळे नावारूपाला आलेली नीती टेलर बिग बॉसमध्ये दिसणार आहे. गुलाम या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे नीतीची बिग बॉसच्या घरात झळकण्याची शक्यता खूपच जास्त असल्याचे म्हटले जात आहे.

niti taylor

पर्ल व्ही पुरी
पर्ल व्ही पुरी त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यातसाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याने मेरी सासू माँ या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अस्मिता सूद, हिना नवाब, करिश्मा तन्ना यांसारख्या अभिनेत्रींसोबत आजवर त्याचे नाव जोडले गेले आहे.

pearl v puri

निकितिन धीर
पंकज धीर यांचा मुलगा निकितिन धीरने छोट्या पडद्यावर त्यांची चांगलीच ओळख निर्माण केली आहे. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातही तो झळकला होता. त्याचे लग्न अभिनेत्री क्रतिका सेनगरसोबत झाले असून त्याने नुकतीच नागार्जुन या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

nikitin dheer

सीझान खान
कसौटी जिंदगी की या मालिकेतील अनुराग या व्यक्तिरेखेमुळे नावारूपाला आलेला सीझान खान बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. सीझानची ही मालिका मालिका संपून अनेक वर्षं झाली असली तरी आजही त्याला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग आहे. 

cezzane khan

राणी चॅटर्जी
भोजपूरी अभिनेत्री राणी चॅटर्जी या कार्यक्रमाचा भाग होणार असल्याचे म्हटले जात आहे.

rani chatterjee

अनुज सक्सेना
कुसूम, कुमकूम या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अनुज सक्सेना बिग बॉसच्या घरात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या कंपनीविरोधात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

anuj saxena

विक्रांत सिंग रजपूत
मोना लिसा ही भोजपूरी अभिनेत्री बिग बॉसच्या गेल्या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात दिसली होती. आता तिचा पती विक्रांत सिंग रजपूत बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

vikrant singh rajput

नवप्रीत बांगा
प्रियांका चोप्रासारखी दिसणारी नवप्रीत बांगादेखील या सिझनमध्ये झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.

navpreet banga

गौरव उर्फ गौरी अरोरा
स्प्लिटव्हिला या कार्यक्रमात गौरव अरोरा झळकला होता. या कार्यक्रमाच्या दरम्यानच त्याने तो बायसेक्शुल असल्याचे कबूल केले होते. आता गौरव हा गौरी असून आपले आयुष्य एक मुलगी म्हणून जगत आहे.

gaurav arora

Also Read: ऐका सलमान खान काय सांगतोय त्याच्या शेजाऱ्यांविषयी


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :