​या अभिनेत्रीवर होते अस्ताद काळेचे जीवापाड प्रेम... कॅन्सरने झाले होते या अभिनेत्रीचे निधन

अस्तादचे एका मुलीवर जीवापाड प्रेम होते. पण तिचे काही वर्षांपूर्वी एका आजाराने निधन झाले. त्यानंतर अस्ताद कधीच कोणत्या नात्यात अडकला नाही.

​या अभिनेत्रीवर होते अस्ताद काळेचे जीवापाड प्रेम... कॅन्सरने झाले होते या अभिनेत्रीचे निधन
Published: 17 May 2018 03:19 PM  Updated: 17 May 2018 03:22 PM

अस्ताद काळे सरस्वती या मालिकेत राघव ही भूमिका साकारत होता. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत होती. या मालिकेतील त्याची आणि सरस्वतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. अस्ताद गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याने अग्निहोत्र, पुढचे पाऊल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्याने चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये देखील काम केले आहे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता अस्ताद एका रिअॅलिटी शो कडे वळला आहे.
अस्तादने त्याच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या मालिकांना, त्यामधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतले आहे. आता अस्ताद बिग बॉस मराठी या कार्यक्रमात झळकत असून त्याला त्याच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. १६ मे १९८३ रोजी पुण्यात जन्मलेल्या आस्तादने वयाची ३५ वर्षं नुकतीच पूर्ण केली आहेत. अस्तादने तिशी उलंडली असली तरी तो आजही अविवाहित आहे. अस्तादने लग्न न करण्यामागे एक खास कारण आहे. अस्तादचे एका मुलीवर जीवापाड प्रेम होते. पण तिचे काही वर्षांपूर्वी एका आजाराने निधन झाले. त्यानंतर अस्ताद कधीच कोणत्या नात्यात अडकला नाही.
अस्तादने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अग्निहोत्र या मालिकेत काम केले होते. या मालिकेत अभिनेत्री प्राची मते त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेतील या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. खऱ्या आयुष्यातही त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच कल्पना होती. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्राचीचे कॅन्सरने निधन झाले. प्राचीला बोनमॅरो कॅन्सर होता आणि तिचा आजार अंतिम टप्प्यात असताना त्याचे निदान झाले होते. प्राचीची तब्येत दिवसेंदिवस ढासाळायला लागली होती. त्यामुळे तिने मालिकांमध्ये काम करणे देखील सोडले होते. तिच्या शेवटच्या दिवसांत अस्ताद तिच्या सतत सोबत होता. तिचे निधन होऊन पाच वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. पण अस्ताद आजही या दुःखातून बाहेर पडू शकलेला नाही. 

astad kale girlfriend

Also Read : ही आहे राजेश शृंगारपुरेची पत्नी, बिग बॉस मराठीमध्ये रेशम टिपणीससोबत असलेल्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहे राजेश

 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :