​कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या एका भागासाठी अमिताभ बच्चन घेतात तब्बल इतके पैसे

​कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या एका भागासाठी अमिताभ बच्चन किती पैसे घेतात हे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल.

​कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या एका भागासाठी अमिताभ बच्चन घेतात तब्बल इतके पैसे
Published: 04 Sep 2017 11:41 AM  Updated: 04 Sep 2017 12:58 PM

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नववा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या सिझनचे प्रेक्षक चांगलेच कौतुक करत आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात भारतीय महिला क्रिकेट संघाच्या टीममधील मंडळी हॉट सीटवर पाहायला मिळाली होती. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करतात. त्यांच्याशिवाय शाहरुख खाननेदेखील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. पण आजही प्रेक्षकांना अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन अधिक भावते. अमिताभ बच्चन यांच्याशिवाय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा कोणी विचार देखील करू शकत नाही. या कार्यक्रमाचे ते गेल्या अनेक सिझनपासून सूत्रसंचालन करत आहे. 
अमिताभ बच्चन यांचे स्पर्धकांशी आदराने वागणे, त्यांचे टेन्शन क्षणात दूर करणे यांसारख्या त्यांच्या गोष्टी प्रेक्षकांना खूपच आवडतात. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा अमिताभ बच्चन अनेक वर्षं भाग आहेत. या कार्यक्रमासाठी ते किती पैसे घेतात याची तुम्हाला कल्पना आहे का? अमिताभ बच्चन एका भागासाठी किती पैसे घेतात हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
कौन बनेगा करोडपतीच्या आठव्या सिझनपेक्षा या सिझनसाठी अमिताभ बच्चन जास्त मानधन आकारत आहेत. गेल्या सिझनपर्यंत एका भागासाठी ते दोन करोड रुपये घेत होते. पण आता त्यांनी आपले मानधन वाढवले असून एका भागासाठी ते तब्बल २.७५ करोड ते तीन करोड इतके पैसे आकारत असल्याची चर्चा आहे.  
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामुळे एखादा स्पर्धक करोडपती होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण या कार्यक्रमामुळे अमिताभ बच्चन तर प्रत्येक भागालाच करोडपती होत आहेत. 
अमिताभ बच्चन यांनी मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक हिट चित्रपट दिल्यानंतर ते छोट्या पडद्यावर वळले. कौन बनेगा करोडपती या त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मन जिंकले. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आज अमिताभ बच्चन हे केवळ मोठ्या पडद्यावरचे नव्हे तर छोट्या पडद्यावरचे देखील तितकेच मोठे नाव आहे. त्यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाप्रमाणेच बिग बॉस या कार्यक्रमाच्या देखील काही सिझनचे सूत्रसंचालन केले आहे. 

Also Read : कौन बनेगा करोड़पती 9च्या सेटवर महिला क्रिकेटर्सने लावली उपस्थिती


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :