आज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा!

मनोरंजनाच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या साई इस्टेट कन्सल्टंट प्रेझेंट्स ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’चा देदीप्यमान सोहळा रविवारी दुपारी १ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तमाम मराठी प्रेक्षकांसाठी नववर्षाची भेट म्हणून ‘झी मराठी’वर या सोहळ्याचे प्रक्षेपण होणार आहे.

आज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा!
Published: 31 Dec 2017 12:27 PM  Updated: 31 Dec 2017 12:55 PM

महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्च्या दैदीप्यमान सोहळ्याची शान मनोरंजनाच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या साक्षीने कमालीची खुलली होती. चंदेरी दुनियेप्रमाणेच उद्योग जगतातील मातब्बर विजेत्यांच्या सळसळत्या अभूतपूर्व प्रतिसादाने स्टायलिश अ‍ॅवॉर्ड सोहळ्याची रंगत रात्रीच्या बरोबरीने कमालीची चढत गेली. स्टाइल ही निव्वळ फॅशन नव्हे तर ते एक भारदस्त स्टेटमेंट असल्याची अनुभूती देणारा हा सोहळा आता प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवता येणार आहे. होय, आज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर या सोहळ्याचे प्रक्षेपण होणार जाणार आहे. त्यामुळे तमाम प्रेक्षकांसाठी ही नववर्षाची भेट ठरेल यात शंका नाही. 

ग्लॅमर, उद्योग आणि फॅशन जगतात वावरत असताना तुमची स्टाइल हेच तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवित असते. महाराष्ट्रातील अशाच स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेत त्यांना सन्मानित केले. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अतिशय दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्यात तमाम मान्यवरांच्या स्टाइलचाच नव्हे तर त्यांच्या यशाचाही गौरव करण्यात आला. 

साई रिअल इस्टेट प्रस्तुत सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर कार्लटन,स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम, पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर होते. या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही जगतातील कलाकारांचा स्टायलिश अवॉर्डने गौरव करण्यात आला. फॅशन तथा उद्योगजगतातील स्टायलिश मान्यवरांनाही यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता प्रेक्षकांना हा संपूर्ण सोहळा घरबसल्या बघता येणार असून, त्यांना एक स्टायलिश अनुभूती देवून जाईल असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :