Lokmat Maharastras most stylish personality award : दिसला या अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज

लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्डवेळी .ग्लॅमसर अभिनेत्रींच्या वेगवेगळ्या स्टायलिश लूकने या सोहळ्याला आपल्या सौदर्यांने चारचाँद लावल्याचे पाहायला मिळाले. वेगवेगळ्या हटेक स्टाइल करत या अभिनेत्रींवरच सा-यांच्या नजरा खिळल्या होत्या.

Lokmat Maharastras most stylish personality award : दिसला या अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज
Published: 01 Feb 2017 04:56 PM  Updated: 02 Feb 2017 10:04 AM

कॉटन किंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्डचं आयोजन लोकमतच्या वतीने मुंबईत करण्यात आलं होतं. प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी लिमिटेड आहेत तर या सोहळ्यासाठी RED FM रेडिओ पार्टनरकलर्स मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा न्यूज पार्टनर असलेल्या या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीमराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. ग्लॅमसर अभिनेत्रींच्या स्टायलिश लूकने या सोहळ्याला आपल्या सौदर्यांने चारचाँद लावल्याचे पाहायला मिळाले. नजर टाकूयात ब्युटी विथ ब्रेन असलेल्या स्टायलिश अभिनेत्रींवर.


सोनम कपूरस्टाइल आयकॉन सोनम कपूरची हजेरी या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरली. नेहमी सोनम आपल्या स्टायलिश लूकने रसिकांचे लक्ष वेधून घेत असते. या पुरस्कार सोहळ्यात स्टायलिश लूकसोबतच सोनम ब्युटी विथ ब्रेन असल्याचीही प्रचिती पुन्हा एकदा आली. लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्डमध्ये ती हटक्या लूक दिसली. या सोहळ्यात सोनम ट्रेडिशनल लूकमध्ये अवतरली. पिवळ्या रंगाच्या कुर्तावर तिने चॉकलेटी रंगाचा दुप्पटा आणि पायजामा असलेला ड्रेस तिने परिधान केला होता. तसेच वेणी घालत केसांची हेअर स्टाइल केली होती. सिंपल अँड सोबर लूकमध्ये सोनम कपूरने उपस्थितांवर मोहिनी घातली. 

सोनाली कूलकर्णीसोनम कपूरप्रमाणेच सोनाली कुलकर्णीचा अंदाजही तितकाच घायाळ कऱणारा होता. काळ्या रंगाच्या वनपीसमध्ये सोनालीचा स्टायलिश लूक उपस्थितांच्या नजरा आकर्षित करत होता. काळ्या रंगाचा फुल स्लीव्हज असलेल्या या वेस्टर्न आऊटफीटमध्ये सोनालीनं या सोहळ्यात उपस्थिती लावली.

सई ताम्हणकर 
सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. तिची प्रत्येक अदा रसिकांना घायाळ करणारी अशी वाटते. सौंदर्य, अदा आणि उत्तम अभिनयाचा अनोखा मेळ सईमध्ये दिसत असल्याने रसिक तिचं तोंडभरुन कौतुक करतात. या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतल्या या ग्लॅमरस अभिनेत्रीने हटके स्टाईल करत रेड कार्पेटवर हजेरी लावली. पांढ-या आणि काळ्या रंगाच्या वनपीसमध्ये सईचा अंदाज तितकाच घायाळ करणारा असा होता. जाळी असलेल्या या वनपीसमध्ये सई जणू काही मस्त्यकन्येप्रमाणेच भासत होती. 


अमृता खानविलकर
आपल्या डान्ससोबतच अभिनय आणि स्टाईलने अमृताने वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृताचे फॅन्स तिचा डान्ससोबतच तिच्या अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. या सोहळ्यात अमृताला तिच्या स्टाइलमुळे सा-यांचे लक्ष वेधून घेतले. काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये अमृताची बोल्ड बिनधास्त स्टाइल प्रत्येकावर जादू करुन गेली.

सोनाली बेंद्र बॉलिवूडमध्ये सोनालीने विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोनाली बेंद्र ग्लॅमसर अभिनेत्रींपैकी असलेली सोनाली बेंद्रेनेही यावेळी इंडोवेस्टर्न आऊटफिटमध्ये हजेरी लावली होती. निळ्या रंगाचा शिमर शर्ट आणि सुवर्ण नक्षीदार लाल रंगाचा फ्रिल असलेला लाँग स्कर्ट परिधान करत सोनालीने या सोहळ्याला हजेरी लावली होती. 
 

आरजे मलिश्कागुड मॉर्निंग मुंबई’ म्हणत रसिकांची फेव्हरेट ठरलेल्या आरजे मलिश्काचाही निराळा अंदाज पाहायला मिळाला. काळ्या रंगाचा शिमर शॉर्ट वनपिसमध्ये सोहळ्यात अवतरलेल्या मलिश्काच्या अनोख्या स्टाईलचं रसिकांनी कौतुक केलं. आपल्या आवाजाच्या सामर्थ्याने मलिश्का कोट्यवधींच्या गळ्यातील ताईत बनली आहे. त्याचप्रमाणे तिच्या बिनधास्त अंदाज, ऍटिट्यूडसह ड्रेसिंग स्टाइलमुळे आरजे मलिश्का विशेष भाव खाऊन गेली.

शाल्मली खोलगडे 

इश्कजादे’ फेम शाल्मली खोडगडे या मराठामोळ्या गायिकाने आपल्या मधुर सूरांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. पदार्पणातच सर्वोत्कृष्ट गायिका या कॅटेगिरीत फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणारी शाल्मली तिच्या स्टाइलमुळेही नेहमीच चर्चेत असते.या सोहळ्यातही तिचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला. पांढ-या आणि सोनेरी स्ट्रीप्स असलेल्या वनपीसमध्ये शाल्मलीची उपस्थिती आकर्षक दिसत होती.


मिथिला पालकर
कप साँगमुळे अल्पवधीतच वेबविश्वात धुमाकूळ घालणारी मराठमोळं सेन्सेशन म्हणजे मिथिला पालकर. कपच्या तालावरील तिचे हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले. वेबविश्वासह मिथिलाचे अनेक फॅन्स निर्माण झालेत. तिच्या टॅलेंटचे कौतुक तर सा-यांनीच केले मात्र या सोहळ्यात मिथिलाच्या स्टायलिश लूकचेही विशेष कौतुक झाले. चॉकलेटी वनपिसमध्ये मिथिला पालकरचा ग्लॅमसरस अंदाज या सोहळ्यात पाहायला मिळाला.  

राधिका आपटेबॉलिवूड आणि मराठीच नाहीतर जगभरातील रसिकांची मनं जिकंणारी मराठीमोळी अभिनेत्री राधिका आपटेची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते. तिची स्टाइलसुद्धा तितकीच खास असते. या सोहळ्यात राधिका पुन्हा एकदा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाजात तिने हजेरी लावली होती. ब्राऊन कलरच्या बॅकलेस गाऊन परिधान करत राधिका या सोहळ्यात अवतरली. ती या ठिकाणी येताच एक से बढकर एक पोज कॅमे-यात कैद झाल्या होत्या.

प्रियंका बर्वेनेहमी आपल्या गायिकीने रसिकांच्या मनाचा ताबा मिळणारी गायिका प्रियंका बर्वेचा लूक सगळ्यांच्या पसंतीस उतरत होती. अगदी बिनधास्त आणि तितकीच कंम्फर्टेबल असणारा फ्रिल असलेला हिरवा आणि काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.तिच्या लकूमुळेही ती सा-यांचे आकर्षण ठरली होती. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :