तुमचे व्यक्तिमत्त्वच ठरविणार तुमची स्टाईल

स्टाइल करताना नेहमीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करावा.

तुमचे व्यक्तिमत्त्वच ठरविणार तुमची स्टाईल
Published: 16 Jan 2017 03:39 PM  Updated: 16 Jan 2017 10:09 AM

स्टाइल करताना नेहमीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करावा. कारण आपले व्यक्तिमत्त्वच आपली स्टाइल ठरवित असते. ब-याचदा असे होते की, आपण इतरांना बघून त्यांची स्टाइल  फॉलो करीत असतो. माझ्या मते, ही बाब पुर्णत: चुकीची आहे. इतरांना फॉलो करण्याऐवजी तुम्ही स्वत:ला ओळखा. कारण स्वत:मध्येच एक स्टाइल दडलेली असते, जी तुम्ही फॉलो करणे अपेक्षित असते. माझ्या स्टाइलविषयी विचारल्यास मी स्वत:वर नेहमीच एक्सपिरीमेंटस करीत असते. मला मेकअप करायला खूप आवडते. स्वत:चा चेहरा निखारून वेगवेगळे प्रयोग करणे मला आवडते. मात्र स्टाइल- विषयीच्या सर्व टिप्स मला माझ्या पतीकडून मिळतात. ते फिटनेसविषयी प्रचंड जागरूक असून, स्टाइल करताना फिटनेस राखणे अत्यावश्यक असल्याचा मला नेहमीच सल्ला देतात. त्याचबरोबर मला सोनाली बेंद्रे आणि सोनम कपूर यांची स्टाइलही खूप प्रभावीत करते. कारण सोनम तिच्या स्टाइलवर खूप प्रयोग करीत असते. बºयाचदा आपल्याला तिचे कपडे तसेच अंगावरील आभूषणे वेगळ्या धाटणीचे वाटतात. मात्र तो तिचा स्टाइलचा भाग असून, त्यात तिचे सौदर्यं उठून दिसते. मात्र ब-याच लोकांचा स्टाइल म्हणजे मेकअप हा समज आहे. माझ्या मते, स्टाइलसाठी मेकअप करायलाच हवा,असे अजिबात नाही. मेकअप न करताही तुम्ही स्टाइल करू शकता.मात्र स्टाइल करताना नेहमीच एका गोष्टीची नेहमीच जाणीव ठेवायला हवी,ती म्हणजे तुमच्या भोवतालचे वातावरण बघून, तेथील लोकांचे विचार लक्षात घेवून तुम्ही स्टाइल करायला हवी. 





 


पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :