Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : माझी स्टाइल माझ्या विचारात दिसेल : चेतन भगत

​कपडे किंवा मेकअपमध्ये माझी स्टाइल दिसणार नाही, तर मी माझी स्टाइल लिखाणात ठेवतो असे मत लेखक चेतन भगत यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स २०१७ या सोहळ्यात ते बोलत होते.

Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : माझी स्टाइल माझ्या विचारात दिसेल : चेतन भगत
Published: 14 Nov 2017 10:31 PM  Updated: 14 Nov 2017 10:31 PM

कपडे किंवा मेकअपमध्ये माझी स्टाइल दिसणार नाही, तर मी माझी स्टाइल लिखाणात ठेवतो असे मत लेखक चेतन भगत यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या महाराष्ट्राज्  मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स २०१७ या सोहळ्यात ते बोलत होते. कुठलेही वृत्तपत्र आता समाजाचा एक बनले असून, लोकमत त्यांचे काम उत्तम करीत आहे. लोकमतला जसे महाराष्ट्राज् यश मिळाले तसेच यश दिल्लीत पण मिळणार अशा शुभेच्छाही यावेळी चेतन भगत यांनी दिल्या. 

लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉडर््स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती. मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु  आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे. लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम ,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे.या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिश पर्सनालिटीजलाच या पुरस्काराचे मानकरी होता येत आहे. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभली आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :