Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : मुख्यमंत्र्यांच्या आवडत्या ‘काजोल’ने आणली बहार ! आईबद्दल बोलताना झाली भावूक!!

​अभिनेत्री काजोलने आई तनुजाच आपली खरी स्टाईल आयकॉन असल्याचं सांगितलं आहे. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्इ २०१७ सोहळ्याला काजोलने हजेरी लावली.

Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : मुख्यमंत्र्यांच्या आवडत्या ‘काजोल’ने आणली बहार ! आईबद्दल बोलताना झाली भावूक!!
Published: 14 Nov 2017 10:43 PM  Updated: 14 Nov 2017 11:37 PM

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री काजोल हिने लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला लावलेली उपस्थिती लक्षणीय ठरली. सोनेरी आणि लाल रंगाच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरलेल्या काजोलने अनेकांच्या काळजाचा छोका चुकवला. या सोहळ्यात काजोलने महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते काजोलला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार देण्यात आला. यानंतर तिच्याशी रंगल्या त्या दिलखुलास गप्पा. माझी आई तनुजा हिच माझी स्टाईल आयकॉन आहे, असे तिने सांगितले. आईबद्दल बोलताना काजोल काहीशी हळवी झालेलीही दिसली.  
आईचे चित्रपट मी फारसे पाहिले नाहीत. कारण त्यानेळी हजारो मुले माझ्या आईला आई बोलत होती. जे मला आवडायचे नाही. त्यामुळे मी आईचे चित्रपट पाहिले नाहीत, अशी प्रामाणिक कबुली काजोलने यावेळी दिली.  आईची स्टाईल इतरांपेक्षा वेगळीच होती,तिची तीच स्टाईल माझी आवडती आहे, असे काजोलने सांगितले. माझ्यासाठी स्टाईल हा शब्द फक्त कपड्यांपुरता मर्यादीत नाही. कारण प्रत्येक गोष्टीत स्टाईल करायला आवडते, असेही तिने सांगितले.
 यावेळी अमृता फडणवीस यांनी काजोल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री असल्याचा खुलासा केला. सोबतच आशिकी चित्रपटातील गाणेही गायले.



लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती.   


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :