पिळदार मिशीमुळे मिळाली वेगळी ओळख_सुशांत सिंह

मिशीशिवाय राहणे शक्यच नाही.

पिळदार मिशीमुळे मिळाली वेगळी ओळख_सुशांत सिंह
Published: 16 Jan 2017 04:58 PM  Updated: 16 Jan 2017 11:28 AM

अभिनयाच्या क्षेत्राता स्टाइलला पूर्वीपासूनच खूप महत्त्व आहे.त्यामुळे या क्षेत्रानेच मला स्टाइल शिकवली.स्टाइलही  आपली पर्सनालिटी आणि एटीड्युडशी जुळलेली असते.तुम्ही जसे आहात तोच एटीड्युड तुमच्या स्टाइलमधून दिसायला हवा.माझ्यासाठी गुलजार साहब स्टाइल आयकॉन आहेत.त्यांचा  कुर्ता पायजामा असलेला पेहराव इतरांवर लगेच रिफ्लेक्ट होतो.अब्बास मस्तान यांची स्टाइल खूप सेन्सिबल आहे.माझ्या स्टाइल विषयी जीन्स आणि शर्टसमध्ये मी जास्त कंम्फर्टेबल असतो.माझ्याकडे 10 वर्षाआधीचे जुने कपडेही आहेत.

ते अतिशय चांगल्यापद्धतीने मी सांभाळून ठेवले आहेत. मिशी ठेण्याचं कारण म्हणजे मी एक सिनेमा केला त्यात थोडी मिशी  ठेवली होती. सिनेमाची शूटिंग संपल्यानंतरही ती मिशी मी तशीच ठेवली होती. एक दिवशी मी जीममध्ये वर्कआऊट करत असताना माझ्या शेजारी ऊभा असणा-या एका माणसाने मला पिळदार मिशी वाढवायचा सल्ला दिला.त्यानंतर मला सावधान इंडिया शोची ऑफर मिळाली. या शोमध्ये पिळदार मिशीतला माझा लूकही सगळ्यांना आवडू लागला. मिशीमुळे मला कडक तडफदार पोलिस,राजकारणी असेच सिनेमा ऑफरही होतात.आता मला मिशीची सवयही झालीय मिशीशिवाय राहणे शक्यच नाही. सो येस मिशीनेच मला एक वेगळी दंबग स्टाइल मिळवून दिलीय.


दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया नच बलियेचे विजेते ठरतील का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :